उस्मानाबाद : युएईतून आलेल्या प्रवाशाच्या संपर्कातील दोघांना कोरोनाची लागण
संयुक्त अरब अमिरात वरुन उस्मानाबादेत आलेल्या ४२ वर्षीय प्रवाशाला कोरोनाची लागण झाल्यामुळे सर्व यंत्रणा अलर्ट झाल्या होत्या. आता या प्रवाशाच्या संपर्कात आलेल्या दोघांनाही कोरोनाची लागण झाल्याचं निष्पन्न झालं आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील बावी गावात ही घटना घडली असून तीन जणांना कोरोनाची लागण झाल्यामुळे प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून गावच्या सीमा बंद करण्याचे आदेश दिले आहेत. याचसोबत गावात […]
ADVERTISEMENT

संयुक्त अरब अमिरात वरुन उस्मानाबादेत आलेल्या ४२ वर्षीय प्रवाशाला कोरोनाची लागण झाल्यामुळे सर्व यंत्रणा अलर्ट झाल्या होत्या. आता या प्रवाशाच्या संपर्कात आलेल्या दोघांनाही कोरोनाची लागण झाल्याचं निष्पन्न झालं आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील बावी गावात ही घटना घडली असून तीन जणांना कोरोनाची लागण झाल्यामुळे प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून गावच्या सीमा बंद करण्याचे आदेश दिले आहेत.
याचसोबत गावात कमल १४४ लागू करण्यात आल्याची माहिती उपविभागीय दंडाधिकारी डॉ. योगेश खरमाटे यांनी दिली.
बाबी या गावातील कोरोनाचा संसर्ग वाढू न देण्यासाठी तातडीने नियंत्रण व प्रतिबंधात्मक उपाय योजनाच्या अनुषंगाने हे आदेश काढण्यात आले असून बावी गावाच्यापासून तीन किलोमीटर पर्यंतच्या परिसरातील नागरिकांवर निर्बंध घालण्यात आले आहेत. ३ किलोमीटरचा पर्यंतचा परिसर रेड झोन तर ७ किलोमीटर पर्यंतचा परिसर बफर झोन म्हणून घोषित करण्यात आला आहे. आजपासून गावात हे आदेश लागू करण्यात येणार आहेत.
बावी गावातील नागरिकांना बाहेर फिरण्यास मज्जाव करण्यात आला आहे. ग्रामीण पोलिसांना या आदेशाची अंमलबजावणी करण्याचे आदेश देण्यात आले असून अत्यावश्यक सेवांमधील लोकांना या आदेशातून सवलत देण्यात आली आहे. परंतू अत्यावश्यक सेवेतील लोकांनी सोशल डिस्टन्सिंगचं पालन करावं असंही आवाहन करण्यात आलं आहे.