गडचिरोली जिल्ह्यातल्या ग्यारापट्टी जंगलात 26 नक्षल्यांचा खात्मा, महाराष्ट्र पोलिसांची कारवाई

मुंबई तक

गडचिरोली जिल्ह्यातल्या ग्यारापट्टी जंगलात 26 नक्षल्यांचा खात्मा करण्यात आला आहे. आज सकाळी पोलीस नक्षल्यांमध्ये मोठी चकमक उडाली होती या भीषण चकमकीत पोलिसांनी आत्तापर्यंत 26 नक्षल्यांना कंठस्नान घालण्यात यश मिळाले आहे. पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार या चकमकीदरम्यान गडचिरोली पोलिसांचे तीन जवान देखील जखमी झाले आहेत. त्यांना घटनास्थळावरून हेलिकॉप्टर ने तात्काळ नागपूरला हलवण्यात आले आहे, मारल्या गेलेल्या […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

गडचिरोली जिल्ह्यातल्या ग्यारापट्टी जंगलात 26 नक्षल्यांचा खात्मा करण्यात आला आहे. आज सकाळी पोलीस नक्षल्यांमध्ये मोठी चकमक उडाली होती या भीषण चकमकीत पोलिसांनी आत्तापर्यंत 26 नक्षल्यांना कंठस्नान घालण्यात यश मिळाले आहे. पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार या चकमकीदरम्यान गडचिरोली पोलिसांचे तीन जवान देखील जखमी झाले आहेत.

त्यांना घटनास्थळावरून हेलिकॉप्टर ने तात्काळ नागपूरला हलवण्यात आले आहे, मारल्या गेलेल्या नक्षल्यात संघटनेचा मोठा के कॅडर असल्याचंही कळतं आहे.

याच वर्षी एप्रिल महिन्यात पोलिसांना नक्षलविरोधी मोहिमेत मोठे यश आले होते. खून, चकमक तसेच जाळपोळीसारखे गंभीर आरोप असलेल्या तसेच 16 लाखांचे बक्षीस जाहीर करण्यात आलेल्या नक्षलवाद्याला पोलिसांनी पकडलं होतं. खोब्रामेंढा येथे झालेल्या सुरक्षा जवान आणि नक्षलवाद्यांच्या चकमकीत 5 नक्षलवाद्यांचा मृत्यू झाला होता. याच चकमकीत हा नक्षलवादी जखमी झाला होता. किशोर कावडो असे अटक करण्यात आलेल्या नक्षलवाद्याचे नाव होते.

आज (13 नोव्हेंबर) सकाळी धानोरा तालुक्यातील मुरूम गाव परिसरातील मर्दिनटोलाच्या जंगलात नक्षलविरोधी पोलीस पथक गस्तीवर होते. यावेळी या भागात मोठ्या संख्येने नक्षलवादी लपून बसल्याची गुप्त माहिती पोलिसांना समजली. या नक्षलवाद्यांनी छत्तीसगड भागातून गडचिरोली जिल्ह्यात प्रवेश केला होता. मिळालेल्या माहितीच्या आधारे नक्षलविरोधी पोलीस पथकाने कॉम्बिंग ऑपरेशन केले. या मोहिमेत जवळपास 26 नक्षलवाद्यांना ठार करण्यात आले.

हे वाचलं का?

    follow whatsapp