पुण्यात इंजिनिअर तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

मुंबई तक

ADVERTISEMENT

mumbaitak
mumbaitak
social share
google news

पुणे: पुण्यातील कोंढवा भागात राहणाऱ्या एका इंजिनिअर तरुणाने गळफास लावून आत्मह्त्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. तरुणांच नाव ऋषिकेश मारुती उमाप (वय 29 वर्ष) असं असून तो कोंढवा येथील कावेरी पार्क सोसायटीमध्ये राहत होता. आपल्या राहत्या घरातच त्याने गळफास लावून घेतला असल्याचं समोर आलं आहे.

ADVERTISEMENT

प्राथमिक माहितीनुसार, गेल्या वर्षभरापासून नोकरी नसल्याने ऋषिकेशने आत्महत्या केली असावी असा अंदाज व्यक्त केला जात आहे. साधारण वर्षभरापूर्वी कोरोनामुळे संपूर्ण देशात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला होता. यामुळे अनेक कंपन्यांचे काम ठप्प झाले होते. त्यामुळे मागील वर्षभरात अनेक तरुणांना आपल्या चांगल्या पगाराच्या नोकऱ्या गमवाव्या लागल्या. तसंच इंजिनिअर असणाऱ्या पुण्यातील ऋषिकेशला देखील आपली नोकरी गमावावी लागली होती.

Dipali Chavan: महिला अधिकारी दीपाली चव्हाणांची गोळी झाडून आत्महत्या

हे वाचलं का?

अखेर नोकरी गेल्याने आणि नवी नोकरी मिळत नसल्याच्या नैराश्यातून ऋषिकेशने गळफास घेऊन आत्महत्या केली असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अशी माहिती कोंढवा पोलिसांनी दिली आहे. एका इंजिनिअर तरुणांने अशा प्रकारे आपलं आयुष्य संपवल्याने पुण्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोंढवा परिसरातील कावेरी पार्क सोसायटीमध्ये ऋषिकेश मारुती उमाप हा तरूण आपल्या कुटुंबीयांसोबत राहत होता. इंजिनिअर असलेला ऋषिकेश हा अनेक वर्षापासून पुण्यातील एका कंपनीत काम करत होता. मात्र, लॉकडाऊनमुळे त्याला आपली नोकरी गमवावी लागली. त्यामुळे तो अनेक महिन्यांपासून घरीच होता. तर त्याचा एक भाऊ बंगळुरुला नोकरीला आहे. त्यामुळे घरातील इतर परिस्थिती ठीक होती.

ADVERTISEMENT

आपल्याला नोकरी नाही ही चिंता मात्र ऋषिकेशला खूप सतावत होती. त्यामुळे तो खूप चिंतेत होता. या सगळ्यात तो सातत्याने आपल्या मोबाइलवर पबाजी गेम खेळत असल्याची देखील माहिती समोर आली आहे.

ADVERTISEMENT

३५ वर्षांपूर्वी महाराष्ट्रात झाली होती पहिली शेतकरी आत्महत्या, डोळ्यात आसवं आणणारी गोष्ट

दरम्यान, ऋषिकेश 29 मार्च रोजी नेहमीप्रमाणे त्याच्या रूममध्ये झोपण्यास गेला. सकाळी बराच वेळ होऊन झाला तरीही ऋषिकेश रुममधून बाहेर आला नाही. त्यामुळे त्याच्या रूममधील खिडकीतून घरातील व्यक्तीनी वाकून पाहिले असता त्यांना मोठा धक्का बसला. कारण ऋषिकेश गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आला.

त्यानंतर कुटुंबीयांनी दरवाजा तोडून त्याला तात्काळ जवळच्या रुग्णालयात नेलं. पण रुग्णालयात आणण्याआधीच त्याचा मृत्यू झाला असल्याचं डॉक्टरांनी घोषित केले. सध्या या संपूर्ण प्रकरणाचा तपास कोंढवा पोलीस करीत असून याबाबत अधिक चौकशी सध्या सुरु आहे.

सोलापुरात महिला पोलीस कॉन्स्टेबलची आत्महत्या, पतीचा खळबजनक आरोप

गेल्या वर्षी कोरोनामुळे अचानक लॉकडाऊन लागू करण्यात आला. ज्याचा विपरित परिणाम हा अर्थव्यवस्थेवर झालेला पाहायला मिळाला. त्यामुळे अनेक कंपन्यांना मोठा आर्थिक फटका बसला. ज्यामुळे अनेकांना आपला रोजगार गमवावा लागला किंवा पगार कपातीला सामोरं जावं लागलं. ज्याचा थेट परिणाम हा प्रत्येकाच्या जीवनावर झाल्याचं पाहायला मिळालं. ज्यामुळे आता काही जण त्यातून अशाप्रकारचं टोकाचं पाऊल उचलत असल्याचं दिसून येत आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT