मलिकांच्या जामीनासाठी तीन कोटींच्या खंडणीची मागणी; फराज मलिक यांची पोलिसांत तक्रार

मुस्तफा शेख

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

राज्याचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांच्या जामीनासाठी तब्बल तीन कोटी रुपयांची खंडणी मागण्यात आली असल्याचा प्रकार समोर आला आहे. मलिक यांचा मुलगा फराज मलिक यांनी यासंदर्भात विनोबा भावे पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. फराज मलिक यांना एक मेल आला आहे, ज्यात बिटकॉईनद्वारे खंडणीची मागणी केली गेली आहे.

राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांना जमीन खरेदी व्यवहाराशी संबंधित मनी लॉंडरिंग प्रकरणात अटक करण्यात आलेली आहे. २३ फेब्रुवारी रोजी मलिक यांना चौकशीनंतर ईडीने अटक केली होती. त्यानंतर सुरुवातीला त्यांना ईडीची कोठडी सुनावण्यात आली. सध्या ते न्यायालयीन कोठडीत आहेत.

मलिकांच्या जामीनासाठी मागितली तीन कोटींची खंडणी; फराज मलिक यांची पोलिसांत तक्रार

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

मलिक यांच्याकडून जामीनासाठी प्रयत्न केले जात असून, हेबियस कॉर्पसच्या आधारावर त्यांनी केलेल्या जामीनाची मागणीही न्यायालयाने फेटाळून लावली आहे. त्यानंतर आता या प्रकरणाला वेगळंच वळण मिळालं आहे.

मलिक यांचा मुलगा फराज मलिक यांना ईमेलद्वारे तब्बल तीन कोटी रुपयांची खंडणी मागण्यात आली आहे. ही खंडणी नवाब मलिक यांच्या जामीनासाठी मागण्यात आली आहे. फराज मलिक यांनी विनोबा भावे पोलीस ठाण्यात यासंदर्भात तक्रार केली आहे.

ADVERTISEMENT

कोणत्या अभिनेत्रीचे कोणासोबत संबंध हे उघड करायला लावू नका, नाहीतर भाजपवाल्यांना… : नवाब मलिक

ADVERTISEMENT

एका मेलवरून खंडणी मागण्यात आली असून, इम्तियाजी असं मेल पाठवलेल्या व्यक्तीचं नाव आहे. महत्त्वाचं म्हणजे तीन कोटींची खंडणी बिटकॉईनद्वारे दिले जावे, असंही या मेलमध्ये म्हटलेलं आहे.

दरम्यान, व्ही.बी नगर पोलिसांनी अद्याप गुन्हा दाखल केलेला नाही. आरोपीची माहिती काढण्यासाठी हा ईमेल सायबर सेलकडे तपासणीसाठी पाठवणार असल्याचं व्ही.बी. नगर पोलिसांनी म्हटलं आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT