VIRAL: एक बुलेटवर हिजाब घातलेल्या 4 मुली, बाईकवरून दिलं फ्लाइंग KISS

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

Bhopal Hijab viral video, Madhya Pradesh Burqa Video: हिजाबचा वाद कर्नाटक (Karnataka Hijab Row)मधून आता मध्य प्रदेश (Madhya pradesh) पर्यंत पोहोचला आहे. भोपाळमध्ये हिजाब परिधान केलेल्या बाइकर्स ‘Khan Sisters’ मुलींचा एक व्हीडिओ व्हायरल होत आहे. मात्र, यातील काही व्हिडिओ जुनेही आहेत. यापैकी एक व्हिडिओ 24 नोव्हेंबर 2020 रोजी अपलोड करण्यात आला होता. जो इंस्टाग्रामवर _khan_sisters_ नावाच्या अकाऊंटवरून शेअर केला होता.

ADVERTISEMENT

वास्तविक, सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या दोन व्हीडिओंपैकी एक व्हीडिओ भोपाळच्या VIP रोड भागातील आहे आणि दुसरा व्हिडिओ श्यामला हिल्सचा आहे. व्हीआयपी रोडच्या व्हीडिओमध्ये दुचाकीस्वार बुलेट आणि स्पोर्ट्स बाईक चालवताना दिसत आहेत. दोघींच्या मागे दोन दुचाकीस्वार बुरखा घालून बसले असल्याचे पाहायला मिळत आहे. या व्हीडिओमध्ये बाइकच्या मागे बसलेले बाइकर्स फ्लाइंग किस देताना दिसत आहेत.

हे वाचलं का?

श्यामला हिल्स भागातील दुसऱ्या व्हिडिओमध्ये एकाच बुलेटवर बुरखा घातलेल्या चार जणी दिसत आहेत. मात्र, अद्यापपर्यंत या व्हीडिओबाबत पोलिसात कोणतीही तक्रार करण्यात आलेली नाही.

काही व्हीडिओ जुने आहेत तर एक व्हीडिओ हा 5 दिवसांपूर्वी अपलोड केलेला आहे. इंस्टाग्रामवर अपलोड करण्यात आलेले काही व्हिडीओ हे जवळपास 2 वर्षे जुने आहेत तर लेटेस्ट व्हिडिओ हा 5 दिवसांपूर्वी अपलोड करण्यात आला आहे. जो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

बाइकवर भाजपची नंबर प्लेट: काँग्रेस

काँग्रेसचे प्रवक्ते नरेंद्र सलुजा म्हणाले की, या व्हिडिओमध्ये बुलेट चालवणाऱ्या दुचाकीस्वारांच्या वाहनाची नंबर प्लेट भाजपच्या रंगात रंगली आहे. नरेंद्र सलूजा यांनी ट्विट करून लिहिले की, ‘या व्हिडिओमध्ये मोटारसायकलवरून जाणाऱ्या मुलींच्या वाहनाची नंबर प्लेट भाजपच्या रंगात रंगली आहे. हे भाजप पुरस्कृत आहे का? भाजप आपल्या राजकीय फायद्यासाठी काहीही करू शकते. भाजपने उत्तर द्यावे, या मुली कोण आहेत?

Karnataka Hijab Row: हिजाब किंवा भगवी शाल परिधान करण्यास बंदी आहे की नाही?
पाहा संविधानात काय म्हटलंय?

संवेदनशील विषयावर राजकारण करू नये: गृहमंत्री

व्हायरल झालेल्या व्हीडिओवरून मध्य प्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांचे वक्तव्यही समोर आले आहे. ते म्हणाले, ‘जेव्हा-जेव्हा असे विषय येतात जे संवेदनशील असतात. त्यावेळी सोशल मीडियावर अनेक प्रकारच्या गोष्टी व्हायरल होऊ लागतात. त्यामुळे आता हा व्हीडिओ आजचा आहे की, कालचा आहे हे सिद्ध होत नाही.’

‘पण माझी सर्वांना विनंती आहे की जेव्हा हा विषय समोर येतो तेव्हा सोशल मीडियावर सगळ्यांनी मर्यादा पाळावी आणि समाजातील सर्व घटकांचे हित जपावे, काँग्रेसने संवेदनशील विषयांवर राजकारण करू नये, खरं तर काँग्रेसला असे विषय जिवंत ठेवायचे आहेत.’ असं म्हणत गृहमंत्र्यांनी काँग्रेसवरच निशाणा साधला.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT