Lok Sabha 2024 RSS : 'आरक्षणाला RSS चा आतून विरोध', 'त्या' व्हिडीओवर भागवत म्हणाले...
Mohan Bhagwat on Reservation and RSS : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी आरक्षणांबद्दल संघाची भूमिका स्पष्ट केली.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
आरक्षणाच्या मुद्द्यावर मोहन भागवत यांचं मोठं विधान
आरक्षणाबद्दल राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका काय?
लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात आरक्षणाचा मुद्दा
Lok Sabha Election 2024, RSS On Reservation : लोकसभा निवडणुकीत 'चारशे पार'ची घोषणा भाजपने दिल्यापासून संविधान बदलणार आणि आरक्षण संपवणार, असे दावे विरोधकांकडून सातत्याने केले जात आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा आरक्षणाला विरोध आहे, असेही विरोधकांकडून म्हटले जात आहे. दरम्यान, एका व्हिडीओचा हवाला देत आरक्षणाबद्दल सरसंघचालक मोहन भागवत यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची आरक्षणाबद्दलची भूमिका पुन्हा एकदा स्पष्ट केली. (Mohan Bhagwat said That, Rashtriya Swayamsevak sangh not against to Reservation)
ADVERTISEMENT
लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने आरक्षण आणि घटना बदलाचा मुद्द्याने राजकारण चांगलंच तापलं आहे. भाजपने दिलेल्या 'चारशे पार'च्या घोषणेवरून विरोधकांनी घेरलं आहे. घटना बदल करण्यासाठी आणि आरक्षण संपवण्यासाठी भाजपला चारशे जागा हव्यात, असे विरोधकांकडून म्हटलं जात आहे.
हेही वाचा >> "मनोज जरांगेला इतकं माहित नाही की...", ओबीसी उमेदवारावरून भुजबळांनी छेडलं
भाजपची मातृ संस्था असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी याला जोडले जात आहे. आरएसएसचा आरक्षणाला विरोध आहे, पण ते जाहीरपणे बोलत नाही, अशी मांडणी विरोधकांकडून होत आहे. यावरच सरसंघचालक मोहन भागवत यांनी सविस्तर भूमिका मांडली आहे.
हे वाचलं का?
हैदराबाद येथील एका शैक्षणिक कार्यक्रमाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक उपस्थित होते. यावेळी त्यांनी संबोधित केले. कार्यक्रमात बोलत असताना त्यांनी आरक्षण आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका यावरही भाष्य केले.
आरक्षण आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ... भागवतांनी मांडली भूमिका
मोहन भागवत म्हणाले, "काल मी इथे आलो, तर मी ऐकलं की, एक व्हिडीओ फिरत आहे. संघवाले बाहेर तर चांगलं बोलतात, पण आत गेल्यावर म्हणतात की, आरक्षणाला आमचा विरोध आहे. बाहेर आम्ही बोलू नाही शकत. ही असत्य आणि चुकीची गोष्ट आहे."
ADVERTISEMENT
हेही वाचा >> 'उद्धव ठाकरे, शरद पवारांबद्दल महाराष्ट्रात सहानुभूतीची लाट', भुजबळांचे मोठे विधान
"जेव्हापासून आरक्षण आलं आहे, तेव्हापासून... संविधानाच्या संमितीने दिलेल्या आरक्षणाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा पूर्ण पाठिंबा आहे. संघ हे म्हणतो की, आरक्षण ज्यांच्यासाठी आहे, त्यांना जोपर्यंत आवश्यक असेल वा सामाजिक गोष्टींमुळे दिले गेले आहे... त्यामुळे तो भेदभाव जोपर्यंत आहे, तोपर्यंत हे आरक्षण सुरू राहायला हवे", असे मोहन भागवत म्हणाले.
ADVERTISEMENT
मोदींचंही आरक्षणावरून मोठं विधान
एकीकडे 'चारशे पार'शी संबंध जोडून भाजपचा आरक्षण संपवण्याचा कट असल्याचे विरोधक सांगत असताना पंतप्रधान मोदीही काँग्रेसला लक्ष्य करताना दिसत आहे. गेल्या काही पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडल्यानंतर मोदी मुस्लीम आरक्षणाच्या मुद्दा बोलताना दिसत आहेत.
हेही वाचा >> भाजपने कापलं तिकीट, पूनम महाजन म्हणाल्या...
"काँग्रेस ओबीसी समाजाचा सर्वात मोठा शत्रू आहे. ओबीसींचे आरक्षण काँग्रेसला मुस्लिमांना द्यायचे आहे", असे मोदींनी म्हटले आहेत. कर्नाटकातील आरक्षणाबद्दल मोदींनी म्हटलेलं आहे की, "काँग्रेसने पुन्हा एकदा मागच्या दरवाजाने मुस्लिम जातींना ओबीसींमध्ये सामील करून धर्माच्या आधारावर आरक्षण दिले आहे", असेही मोदींनी म्हटले आहे. त्यामुळे लोकसभेच्या उर्वरित टप्प्यातील प्रचारात आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापण्याची शक्यता दिसत आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT