बीड: पान टपरीजवळ उभ्या असलेल्या चौघांना भरधाव कारने चिरडलं, तिघांचा मृत्यू

मुंबई तक

रोहिदास हातागळे, बीड: बीड जिल्ह्यातील घाटनांदूर येथे रस्त्याच्या कडेला पान टपरी समोर बोलत उभे असलेल्या चौघांना एका भरधाव कारने चिरडल्याची घटना आलेल्या सोमवारी (4 एप्रिल) रात्री 10 वाजेच्या सुमारास घडली. या भीषण अपघातात दोघांचा जागेवर तर एकाचा व्यक्तीचा रुग्णालयात नेत असतानाच मृत्यू झाला. अंबाजोगाईकडून घाटनांदूरकडे जाणाऱ्या या कारची ही धडक एवढी जोरदार होती की, त्यामध्ये […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
google news

रोहिदास हातागळे, बीड: बीड जिल्ह्यातील घाटनांदूर येथे रस्त्याच्या कडेला पान टपरी समोर बोलत उभे असलेल्या चौघांना एका भरधाव कारने चिरडल्याची घटना आलेल्या सोमवारी (4 एप्रिल) रात्री 10 वाजेच्या सुमारास घडली. या भीषण अपघातात दोघांचा जागेवर तर एकाचा व्यक्तीचा रुग्णालयात नेत असतानाच मृत्यू झाला. अंबाजोगाईकडून घाटनांदूरकडे जाणाऱ्या या कारची ही धडक एवढी जोरदार होती की, त्यामध्ये कारचा देखील चक्काचूर झाला आहे.

अंबाजोगाईकडून कार क्रमांक MH-24-V-2518 अतिशय भरधाव वेगात आली. यावेळी घाटनांदूरच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात कार अनियंत्रित झाली आणि रस्त्यावर उभ्या असलेल्या चौघांना धडक देऊन जवळपास शंभर मीटरपर्यंत त्यांना फरफटत नेलं.

या अपघातात वैभव सतीश गिरी ( वय 28 ), लहू बबन काटुळे (वय 30) यांचा जागीच मृत्यू झाला. तर रमेश विठ्ठल फुलारी (वय 47), उद्धव निवृत्ती दोडतले (वय 50) आणि कारमधील दोघे गंभीर जखमी झाले.

दरम्यान, रमेश फुलारी यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी लातूरला हलवण्यात आले होते. मात्र त्यांचा वाटेतच मृत्यू झाला.

हे वाचलं का?