Lok Sabha Election Phase 1 : पहिल्या टप्प्यातील 102 जागांपैकी इंडिया आणि एनडीएने किती जिंकलेल्या?
Lok Sabha election phase 1 Voting : लोकसभेच्या निवडणुकीसाठी पहिल्या टप्प्यात १०२ जागांसाठी मतदान होणार आहे.
ADVERTISEMENT

Lok Sabha Election Phase 1 Voting : लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील प्रचार बुधवारी (17 एप्रिल) संध्याकाळी संपला. या टप्प्यासाठी उद्या म्हणजेच 19 एप्रिल रोजी मतदान होत आहे. महाराष्ट्रातील 5 लोकसभा मतदारसंघांसह 21 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील लोकसभेच्या 102 जागांसाठी मतदान होणार आहे.
पहिल्या टप्प्यातील मतदारसंघासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 36 रॅली आणि 7 रोड शो केले. गृहमंत्री अमित शाह यांनी आतापर्यंत 22 सार्वजनिक कार्यक्रम केले आहेत, ज्यात 8 रोड शो आणि 14 जाहीर सभांचा समावेश आहे.
दुसरीकडे काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, काँग्रेस नेते राहुल गांधी आदी काँग्रेसच्या नेत्यांनीही देशभरात सभा घेतल्या आणि रोड शो केले.
विरोधी पक्षांच्या नेत्यांनी निवडणूक रोखे, एजन्सीचा कथित गैरवापर, महागाई आणि बेरोजगारी या मुद्द्यांवर सरकारला धारेवर धरले.