Lok Sabha 2024 : शिंदेंनी रत्नागिरी-सिंधुदुर्गची जागा गमावली; भाजपने जाहीर केला उमेदवार

ऋत्विक भालेकर

ADVERTISEMENT

Mumbai: Maharashtra Chief Minister Eknath Shinde with his deputies Devendra Fadnavis and Ajit Pawar addresses a press conference, in Mumbai, Saturday, March 16, 2024. (PTI Photo)(PTI03_16_2024_000174A)
Mahayuti alliance
social share
google news

Ratnagiri Sindhudurg Lok Sabha Lok Sabha, Narayan Rane : महायुतीमध्ये रत्नागिरी-सिंधुदुर्गची जागा अपेक्षाप्रमाणे भाजपने घेतली आहे. या जागेसाठी शिंदेंच्या शिवसेनेचे नेते उदय सामंत आणि किरण सामंत यांच्याकडून प्रयत्न सुरू होते, पण भाजपने आता नारायण राणे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे शिवसेनेला वर्चस्व असलेला कोकणातील महत्त्वाचा मतदारसंघ भाजपकडे गेला आहे. (Narayan Rane will contest lok sabha election as bjp candidate from Ratnagiri sindhudurg)

रत्नागिरी-सिंधुदुर्गसह इतर काही जागांवरून महायुतीचे जागावाटप रखडलेले आहे. सातारा लोकसभा मतदारसंघातून उमेदवार जाहीर केल्यानंतर आता भाजपने रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघातून नारायण राणे यांना उमेदवारी दिली आहे.

हेही वाचा >> मोदी सरकार 400 पार की INDIA आघाडी करणार पलटवार करणार?

Bjp Annouced Narayan Rane name as Candidates from ratnagiri sindhudurg lok Sabha
नारायण राणे यांना भाजपने रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे.

 

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

शिवसेना होती आग्रही

शिवसेनेची ताकद असलेल्या या लोकसभा मतदारसंघातून किरण सामंत हे निवडणुकीची तयारी करत होते. त्यांनी यासाठी प्रयत्नही केले. त्यांचे बंधू उदय सामंत यांनीही यासाठी प्रयत्न केले. पण, त्याला यश आले नाही. पत्रकार परिषद घेऊन उदय सामंत यांनी किरण सामंत हे माघार घेत असल्याचे आणि नारायण राणे यांचा प्रचार करणार असल्याचे जाहीर केले. 

भाजपने आधीच केला होता दावा

रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघावर भाजपने जागावाटपाची चर्चा सुरू होण्याआधीच दावा केला होता. यावरून उदय सामंत, किरण सामंत विरुद्ध नारायण राणे यांच्या सोशल मीडियावर वाद रंगला होता.

ADVERTISEMENT

हेही वाचा >> महाराष्ट्रातील 48 मतदारसंघामध्ये कोण जिंकणार? बघा संपूर्ण यादी 

यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मध्यस्थी केली होती. काही दिवसांपूर्वी नारायण राणे यांनी आपण निवडणूक लढवणार असल्याचे सांगितल्यानंतर किरण सामंत यांनी माघार घेत असल्याचे सोशल मीडियावरून जाहीर केले होते. पण, नंतर त्यांनी ती पोस्ट डिलीट केली होती.

ADVERTISEMENT

हेही वाचा >> "देवेंद्रजींना कोणत्याही क्षणी अटक होणार होती", पाटलांचा गौप्यस्फोट 

शिवसेनेचा या जागेवरील दावा कायम राहावा, यासाठी किरण सामंत यांना पोस्ट डिलीट करायला सांगितलं गेलं असल्याची माहिती नंतर समोर आली होती. त्यानंतर किरण सामंत आणि उदय सामंत यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा केली. पण, अखेर ही जागा मिळवण्यात नारायण राणे यांनी बाजी मारली. 

    follow whatsapp

    ADVERTISEMENT