झटपट श्रीमंतीचा हव्यास… पोहोचले थेट पोलीस ठाण्यात; डोंबिवलीतील घटना
झटपट श्रीमंत होण्याच्या मोहातून पाच जणांना गजाआड जावं लागलं. डोंबिवलीत ही घटना घडली असून, मानपाडा पोलिसांनी कारवाई केली. पाच जणांनी एक-दोन नव्हे तर तब्बल ७८ एसी चोरले होते. महत्त्वाचं म्हणजे चोरलेल्या एसी आरोपींनी रस्त्यावर फेरीवाले बनून विकल्याचं समोर आल्यानं पोलिसांनाही धक्का बसला. पैसे मिळवण्याच्या लालचेनं ७८ एसी चोरण्यात आल्याची धक्कादायक घटना डोंबिवलीत घडली होती. फेरीवाला […]
ADVERTISEMENT

झटपट श्रीमंत होण्याच्या मोहातून पाच जणांना गजाआड जावं लागलं. डोंबिवलीत ही घटना घडली असून, मानपाडा पोलिसांनी कारवाई केली. पाच जणांनी एक-दोन नव्हे तर तब्बल ७८ एसी चोरले होते. महत्त्वाचं म्हणजे चोरलेल्या एसी आरोपींनी रस्त्यावर फेरीवाले बनून विकल्याचं समोर आल्यानं पोलिसांनाही धक्का बसला.
पैसे मिळवण्याच्या लालचेनं ७८ एसी चोरण्यात आल्याची धक्कादायक घटना डोंबिवलीत घडली होती. फेरीवाला बनून आरोपींनी या एसी रस्त्यावर उभं राहून विकल्या. या प्रकरणी मानपाडा पोलिसांनी पाच चोरट्यांना अटक केली असून, त्यांच्याकडून चोरलेल्या एसींपैकी २० एसी जप्त करण्यात आल्या आहेत.

पोलिसांनी आरोपींकडून २० एसी ५ लाख ८८ हजार रूपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला. तसेच १५ लाख रूपये किमतीच्या दोन ईर्टिगा कारसुद्धा जप्त केल्या आहेत. या कार आरोपींनी गुन्ह्यात वापल्याचं पोलिसांनी सांगितलं असून, प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.










