कोल्हापुरात ७ वर्षांच्या मुलाचा नरबळी दिल्याचा संशय? आरोपी अटकेत
कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातल्या सोनाळी येथील वरद पाटील या सात वर्षांच्या मुलाची हत्या झाल्याचं अखेरीस उघड झालंय. महत्वाची गोष्ट म्हणजे पोलिसांनी या प्रकरणात मयत वरद पाटील याच्या वडीलांचा मित्र दत्तात्रय उर्फ मारुती वैद्यला या प्रकरणात अटक केली असून आरोपीने खुनाची कबुली दिल्याचं कळतंय. आरोपीने केलेलं हे कृत्य नरबळीचा प्रकार असल्याचा संशय वरदच्या नातेवाईकांनी व्यक्त केला […]
ADVERTISEMENT

कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातल्या सोनाळी येथील वरद पाटील या सात वर्षांच्या मुलाची हत्या झाल्याचं अखेरीस उघड झालंय. महत्वाची गोष्ट म्हणजे पोलिसांनी या प्रकरणात मयत वरद पाटील याच्या वडीलांचा मित्र दत्तात्रय उर्फ मारुती वैद्यला या प्रकरणात अटक केली असून आरोपीने खुनाची कबुली दिल्याचं कळतंय. आरोपीने केलेलं हे कृत्य नरबळीचा प्रकार असल्याचा संशय वरदच्या नातेवाईकांनी व्यक्त केला आहे.
दरम्यान या घटनेनंतर सोनाळी गावात स्थानिकांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी आहे. सात वर्षांच्या मुलाला आपले प्राण गमवावे लागल्यानंतर ग्रामस्थांनी आक्रोश व्यक्त केला असून पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून गावात मोठ्या प्रमाणात पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.
काय आहे नेमकं प्रकरण?
कागल तालूक्यातील रविंद्र पाटील हे जनावरांचे डॉक्टर आहेत, तसंच ते शेती व्यवसायही करतात. काही दिवसांपूर्वी रविंद्र यांच्या पत्नी पूनम यांना दुसरं अपत्य झाल्यामुळे त्या आपल्या माहेरी गेल्या होत्या. पूनम यांच्या भावाने सावर्डे गावात नवीन घर बांधल्यामुळे त्याच्या वास्तूशांतीचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. यासाठी रविंद्र पाटील आणि वरद हे सावर्डे गावात गेले होते. वास्तुशांतीचा कार्यक्रम झाल्यानंतर जेवणाचा कार्यक्रम पार पडला आणि त्यानंतर सर्वजण आपल्या कामात व्यस्त होते.










