मंत्रिमंडळ बैठक संपली! शिंदेंनी मंत्रिमंडळालाच लावला सुरुंग, शिवसेनेच्या 8 मंत्र्यांची दांडी
मुंबई: महाराष्ट्राच्या राजकारणात उलथापालथ झाली आहे. महाविकास आघाडी सरकारला एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) सुरुंग लावला आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात काय होऊल हे सध्यातरी कोणी सांगू शकत नाही. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आज मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणार अशी चर्चा होती. परंतु नुकत्याच झालेल्या कॅबिनेट बैठकीत मुख्यमंत्री हजर होते तेव्हा त्यांनी राजीनाम्याबद्दल शब्द देखील काढलेला नाही. मंत्री […]
ADVERTISEMENT
मुंबई: महाराष्ट्राच्या राजकारणात उलथापालथ झाली आहे. महाविकास आघाडी सरकारला एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) सुरुंग लावला आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात काय होऊल हे सध्यातरी कोणी सांगू शकत नाही. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आज मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणार अशी चर्चा होती. परंतु नुकत्याच झालेल्या कॅबिनेट बैठकीत मुख्यमंत्री हजर होते तेव्हा त्यांनी राजीनाम्याबद्दल शब्द देखील काढलेला नाही. मंत्री बाळासाहेब थोरात यांनी सराकरला कोणताच धोका नसल्याचे सांगितले आहे. सरकार स्थीर आहे असेही थोरात म्हणाले. या मंत्रींमंडळ बैठकीत शिवसेनेचे आठ मंत्री गैरहजर होते.
ADVERTISEMENT
गैरहजर असलेले मंत्री
1) एकनाथ शिंदे
हे वाचलं का?
2) गुलाबराव पाटील
3) दादा भूसे
ADVERTISEMENT
4) संदीपन भुमरे
ADVERTISEMENT
5) अब्दुल सत्तार
6) शंभूराज देसाई (राज्यमंत्री)
7) बच्चू कडू
8) राजेंद्र यड्रावकर
हे आठ मंत्री बैठकीला गैरहजर होते. आणि हे सर्व मंत्री शिवसेनेचे आहेत. त्यामुळे शिवसेनेला फार मोठा मानला जात आहे. मुख्यमंत्र्यांच्या चेहऱ्यावर कसलाही तणाव नव्हता असेही समोर आले आहे.
शिवसेना आमदार म्हणाले- राष्ट्रवादीला आम्हाला संपवायचे आहे
या गदारोळात शिवसेनेच्या आणखी एका आमदाराने भाजपसोबत जाण्याचे संकेत दिले आहेत. हे आमदार शिंदे यांच्यासोबत गुवाहाटीत नसून मुंबईतच आहेत. शिवसेनेचे (Shivsena) आमदार दीपक केसरकर म्हणाले की, भाजपसोबत जाण्याचा मी पहिल्या दिवसापासून विचार करत आहे. राष्ट्रवादी आम्हाला संपवत आहे. हे मी उद्धव ठाकरेंना अनेकदा सांगितले आहे. शिंदे आता जे बोलत आहेत ते बरोबर आहे. शिवसैनिकांनी मला वाईट वागणूक दिली. त्यांना माझी गाडी थांबवायची होती.
दरम्यान गुवाहाटीमध्ये पोहोचल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी आपल्यासोबत 46 आमदार असल्याचा दावा केला आहे. यात शिवसेना आणि अपक्ष आमदारांचा समावेश आहे. शिवसेना नेते एकनाथ शिंदे राष्ट्रवादी-काँग्रेस आघाडीवर नाराज आहेत.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT