सांगलीतल्या दीड टनाच्या रेड्याचा हत्तीपेक्षाही मोठा थाट! कृषी प्रदर्शनात ‘गजेंद्र’चीच चर्चा
स्वाती चिखलीकर, प्रतिनिधी, सांगली सांगलीतल्या दीड टनाच्या रेड्याची चर्चा सध्या चांगलीच रंगली आहे. या रेड्याचं नाव गजेंद्र आहे. मंगसुळी गावातला हा रेडा तासगावच्या कृषी प्रदर्शनातील मुख्य आकर्षण ठरला आहे. काळा कुळकुळीत रंग, 80 लाख किंमत, पुरूषभर उंची, हत्तीलाही मागे सारेल असं रूप असं या रेड्याचं वर्णन सगळेच करत आहेत. तासगाव येथील कृषी प्रदर्शनात सध्या या […]
ADVERTISEMENT
स्वाती चिखलीकर, प्रतिनिधी, सांगली
ADVERTISEMENT
सांगलीतल्या दीड टनाच्या रेड्याची चर्चा सध्या चांगलीच रंगली आहे. या रेड्याचं नाव गजेंद्र आहे. मंगसुळी गावातला हा रेडा तासगावच्या कृषी प्रदर्शनातील मुख्य आकर्षण ठरला आहे.
काळा कुळकुळीत रंग, 80 लाख किंमत, पुरूषभर उंची, हत्तीलाही मागे सारेल असं रूप असं या रेड्याचं वर्णन सगळेच करत आहेत. तासगाव येथील कृषी प्रदर्शनात सध्या या रेड्याची चर्चा आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमेवर असलेल्या मंगसुळी गावातले विलास नाईक हे या रेड्याचे मालक आहेत.
हे वाचलं का?
गजेंद्र रेडा हा रोज 15 लिटर दूध, हिरवा चारा, ऊस, शेंगदाण्याची पेंड, पशू खाद्य असा चौरस आहार दिवसातून चारदा विभागून दिला जातो. या चौरस खुराकामुळेच गजेंद्रची अंगकाठी मजबूत झाली आहे. या रेड्याची किंमत 80 लाख रूपये झाली आहे.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने आयोजित केलेल्या या आठव्या कृषी प्रदर्शनात गजेंद्रने दमदार एंट्री केली. त्यानंतर बघता बघता या परिसरातील असंख्य लोक त्याला पाहण्यासाठी येऊ लागले. त्याचा खुराक , त्याच्या संगोपनासाठी व्यवस्था याची माहिती ते घेऊ लागले. आणि गजेंद्र या कृषी प्रदर्शनाच्या आकर्षणाचं केंद्रबिंदू ठरला. घरच्याच म्हशीचे पिलू असलेला गजेंद्र चार वर्षाचा आहे. ज्याचा आहार प्रचंड आहे. रोज 15 लिटर दूध पिणाऱ्या , पेंड , हिरवे गवत , ऊस खाणाऱ्या या रेड्याची चर्चा मात्र सांगली परिसरात चांगलीच रंगली आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
आमच्या रेड्याचं वय चार वर्षे आहे. पेंड, शेंगदाण्यांचा खुराक, 15 लिटर दूध हा तिचा खुराक आहे. या रेड्याचं वजन दीड टन आहे. 80 लाख रूपये किंमतीची विचारणा झाली आहे असं रेड्याचे मालक विलास नाईक यांनी सांगितलं आहे.
आम्ही गेल्या 8 वर्षांपासून कृषी प्रदर्शन भरवतो आहेत. तासगावच्या या कृषी प्रदर्शनात आकर्षणाचा विषय ठरतो आहे तो गजेंद्र रेडा. या रेड्याला 80 लाख रूपये किंमतीची मागणी आली आहे असं स्वाभिमानीचे महेश खराडे यांनी सांगितलं.
आणखी काय म्हणाले महेश खराडे?
हा रेडा आमच्या शेतीची शान बनला आहे. अशा रेड्यांना वाढविण्यासाठी लाखो रुपयांचा खर्च येतो. मात्र, त्यापासून तयार होणारे जीव हे चांगल्या दर्जाचे असतात. या शेतकऱ्यांकडून प्रेरणा घेऊन आमच्या जिल्ह्यातील इतर शेतकरी जनावरांचे निरोगी संगोपन करतील. त्यामुळे त्यांना चांगलं उत्पादन देखील मिळेल. आपल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी असा विचार करून पशुसंवर्धन करणे गरजेचे झाले आहे, असं स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष महेश खराडे म्हणाले.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT