Oxygen Plant: हवेतून दर तासाला 86 हजार लिटर ऑक्सिजन निर्मिती, महाराष्ट्रात कुठे सुरु होणार प्लांट?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

बीड: कोरोनाच्या (Corona) वाढत्या भीषण प्रादुर्भावामुळे बीड (Beed) जिल्ह्यातील रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनचा (Oxygen) तुटवडा निर्माण होत आहे. ही गंभीर बाब लक्षात घेऊन जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी महावितरणच्या वरिष्ठ यंत्रणेशी चर्चा करून परळीच्या थर्मल पॉवर प्लांटमधील युनिट क्र. 8चा ऑक्सिजन निर्मिती प्लांट हा अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालयात शिफ्ट करण्याचा निर्णय घेतला आहे.

ADVERTISEMENT

थर्मल पावर प्लांटमधील या ऑक्सिजन निर्मिती प्लांटद्वारे दर तासाला 86 हजार लिटर ऑक्सिजन हवेतून वेगळा करण्याची क्षमता आहे. त्यामुळे अंबाजोगाई येथील एसआरटी ग्रामीण रुग्णालयात चोवीस तासात साधारण 300 जम्बो सिलेंडर ऑक्सिजन तयार होईल व यामुळे येथील ऑक्सिजनचा तुटवडा कायमचा मिटणार आहे.

Second Wave : भारतात एवढ्या झपाट्याने का पसरतो आहे कोरोना?

हे वाचलं का?

परळी औष्णिक विद्युत केंद्रात वीजनिर्मितीसाठी वापरल्या जाणाऱ्या पाण्यात शेवाळ साठून पाणी खराब होऊ नये यासाठी हा ऑक्सिजन प्लांट कार्यान्वित करण्यात येतो. केंद्रातील युनिट क्र.6 व 7 मधील ऑक्सिजन प्लांट पूर्ववत राहतील. युनिट क्र.8 मधला प्लांट मात्र अंबाजोगाईला शिफ्ट करण्यात येत आहे.

ADVERTISEMENT

या प्लांटला कार्यान्वित करण्यासाठी आवश्यक असणारी सामग्री परळी थर्मल प्लांट प्रशासनाकडे प्राप्त झाली असून, एसआरटी रुग्णालयात यासाठी लागलेल्या जागेची पाहणी करण्यात आली आहे. आज (शुक्रवार) ही सामग्री अंबाजोगाई येथे पाठवण्यात येईल व येत्या 10 ते 15 दिवसात या प्लांटद्वारे प्रत्यक्ष ऑक्सिजन निर्मितीला सुरुवात होईल. अशी माहिती थर्मल केंद्राचे मुख्याधिकारी मोहन आव्हाड यांनी दिली. आव्हाड यांनी पालकमंत्री मुंडे यांच्या सूचनेनुसार एसआरटीमध्ये जाऊन जागेची पाहणी देखील केली.

ADVERTISEMENT

एसआरटी रुग्णालयातील ऑक्सिजन रिसिव्हर टॅंकची क्षमता एकावेळी 20 हजार लिटर इतका ऑक्सिजन साठवून ठेवण्याइतकी आहे. त्यामुळे येथे आता ऑक्सिजनची कमतरता भासणार नाही.

Corona Curfew च्या दुसऱ्या दिवशी महाराष्ट्रात 61 हजारांपेक्षा जास्त रूग्ण पॉझिटिव्ह

महावितरणमार्फत आलेल्या या सामग्रीचा वापर करून ऑक्सिजन निर्मिती प्लांट अंबाजोगाईला शिफ्ट करण्यासाठी धनंजय मुंडे यांच्या सूचनेनुसार महावितरणचे वरिष्ठ अधिकारी, विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर, बीडचे जिल्हाधिकारी रवींद्र जगताप, परळी औष्णिक विद्युत केंद्राचे मुख्याधिकारी मोहन आव्हाड, उपविभागीय अधिकारी श्रीमती नम्रता चाटे, एसआरटीचे अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुकरे यांनी वेगाने सूत्रे हलवली आहेत. त्यामुळे ऑक्सिजन निर्मिती प्लांट सुरू करण्याचे काम आजपासून सुरू होणार आहे.

राज्यात रुग्णसंख्या वाढत असताना ऑक्सिजनच्या मागणीत वाढ होत आहे. राज्यात दररोज 1200 मेट्रीक टन ऑक्सिजनचे उत्पादन होत असून त्यापैकी 80 टक्के वापर वैद्यकीय कारणासाठी करण्याचा निर्णय घेतला आहे.

महाराष्ट्रातील परिस्थिती फारच चिंताजनक

महाराष्ट्रात सध्या कोरोनाची स्थिती फारच चिंताजनक आहे. सध्या कोरोनाची दुसरी लाट राज्यात पाहायला मिळत आहे. अशावेळी पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ही अत्यंत झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे ऑक्सिजनचा पुरवठा देखील त्याच प्रमाणात होणं गरजेचं आहे. सध्या जेवढ्या प्रमाणात ऑक्सिजनचं उत्पादन केलं जात आहे त्यापैकी 80 टक्के वापर हा वैद्यकीय कारणासाठी केला जात आहे. मात्र, तरीही ऑक्सिजनचा तुटवडा भासू शकतो. यावरुन आपल्याला लक्षात येईल की, महाराष्ट्रातील आरोग्य व्यवस्थेवर किती ताण असेल.

अकोल्यातही हवेतून ऑक्सिजन निर्माण करण्याचा प्लांटला मंजुरी:

दरम्यान, बीड प्रमाणेच अकोल्यात देखील हवेतून ऑक्सिजन निर्माण करण्याचा प्लांट उभारण्याला राज्यमंत्री बच्चू कडू यांनी दोन दिवसांपूर्वी मंजुरी दिली होती. महाराष्ट्रातला हा पहिला प्रयोग असेल असा दावा तेव्हा बच्चू कडू यांनी केला होता.

भविष्यात ऑक्सिजनचा तुटवडा झाल्यास हवेतूनच ऑक्सिजन निर्माण करावा लागेल ही गोष्ट विचारात घेऊन अकोल्यात आता नवीन प्लांट तयार करण्यात येत आहे. हा प्लांट एका महिनाभरात तयार होणार असून राज्य शासनाची व प्रशासनाची मंजुरी त्याला दिली गेली आहे.

ही माहिती राज्याचे शिक्षण राज्यमंत्री व अकोल्याचे पालकमंत्री बच्चू कडू यांनी माध्यमांना दिली होती.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT