Sindhudurga: मालवण हादरलं, तारकर्ली समुद्रात 20 पर्यटकांसह बोट बुडाली, दोघांचा मृत्यू

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

सिंधुदुर्ग: मालवणनजीक तारकर्ली समुद्रात स्कुबा डायव्हिंगहून परतत असणारी एक बोट अचानक समुद्रात बुडाली. या बोटीत 20 हून अधिक पर्यटक होते. ज्यापैकी दोन पर्यटकांचा बुडून मृत्यू झाला असून एका पर्यटकाची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते आहे. तर 16 जणांना वाचविण्यात आल्याची प्राथमिक माहिती समजते आहे.

ADVERTISEMENT

नेमकी घटना काय?

मालवणच्या तारकर्ली समुद्रात एक बोट वीस पर्यटकांना घेऊन स्कुबा डायव्हिंगसाठी गेली होती. स्कुबा डायव्हिंग करुन बोट परतत असतानाच किनाऱ्यापासून काही मीटर अंतरावर अचानक ही बोट बुडाली. ज्यामधील 20 पर्यटकही समुद्रात बुडाले. यापैकी दोन पर्यटकांचा मृत्यू झाला असून दोन पर्यटकांची प्रकृती चिंताजनक आहे.

हे वाचलं का?

मे महिना सुरु असल्याने सध्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात पर्यटनाचा हंगाम सुरू आहे. पर्यटकांची मोठी पसंती ही मालवणसह तारकर्लीला असते. तारकर्ली हे पर्यटनाचे माहेरघर मानले जाते. पुणे आणि मुंबईतुन एक ग्रुप पर्यटनासाठी तारकर्लीमध्ये आला होता. हे सगळेच 20 जण पर्यटक स्कुबा डायव्हिंगसाठी समुद्रात गेले होते. स्कुबा डायव्हिंग आटपून हे पर्यटक तारकर्ली समुद्र किनाऱ्याच्या दिशेने परतत होते.

दरम्यान आलेल्या सोसाट्याच्या वाऱ्याने स्कुबा डायव्हिंगची बोट अचानक समुद्रात पलटी झाली आणि यामधील सर्व 20 पर्यटक समुद्रात बुडू लागले. दरम्यान, वेळीच मदत मिळाल्याने बुडणाऱ्या 20 ही पर्यटकांना समुद्रकिनारी आणण्यात आलं. त्यापैकी दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. तर दोन जणांचा अंत झाला.

ADVERTISEMENT

वीस जणांना तात्काळ मालवणच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. यामध्ये उपचारादरम्यान दोघांचा मृत्यू झाला. दोघे जण अतिशय गंभीर स्थितीमध्ये आहेत. यात उपचार घेणाऱ्यांमध्ये लहान मुले व महिलांचा देखील समावेश आहे.

ADVERTISEMENT

Wardha नदीमध्ये बोट उलटून 11 जण बुडाले, तीन मृतदेह हाती

खरं तर पावसाळा जवळ आल्याने स्कुबा डायव्हिंग हे शासनाने बंद केले होते. पण स्थानिक व्यावसायिकाने स्वतःच्या अति आत्मविश्वासावर आजपासूनच पुन्हा स्कुबा डायव्हिंग सुरू केले होते. ज्यामुळे दोन जणांना हकनाक आपले प्राण गमावावे लागले आहेत.

दरम्यान, या संपूर्ण घटनेची पोलीस आता कसून चौकशी करत आहे. उपचार घेत असलेल्या 16 जणांची प्रकृती स्थिर असल्याचे समजते आहे. दरम्यान, ह्या घटनेने एकच गोंधळ उडाला. मालवण तालुक्यातील सर्व पर्यटकांमध्ये एकच घबराट पसरली आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT