YouTube वरील गळफासाच्या Video ने घेतला आठवीतील मुलाचा जीव, काय घडलं?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

Eighth Standard student died while watching a YouTube video: नागपूर: नागपूरमधील (Nagpur) सोमवारी क्वार्टर परिसरात Youtube Video पाहून गळफास घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका अल्पवयीन मुलाचा जीव गेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आठवीत शिकणारा विद्यार्थी हा गळफास कसा घ्यायचा (hang himself) आणि कसा काढायचा याचा व्हिडीओ youtube वर पाहत होता. त्याचवेळी त्याने ओढणीने स्वत:ला गळफास लावून घेण्याचा प्रयत्न केला. यासगळ्या प्रकारात ओढणीचा फास हा मुलाच्या गळ्याला बसला आणि त्यातच त्याचा जीव (student died) गेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. (a boy studying in eighth standard lost his life while watching a youtube video on how to hang himself)

ADVERTISEMENT

अग्रण्य सचिन बारापात्रे असे 12 वर्षीय युवकाचे नाव असून त्याचे आई-वडील कामानिमित्त बाहेर असताना अग्रण्य गच्चीवर गळफास घेतलेल्या स्थितीत शेजाऱ्यांना दिसून आला. त्यानंतर त्याला तात्काळ नागपुरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी नेण्यात आले. परंतु डॉक्टरने त्याला मृत घोषित केलं.

पोलिसांनी केलेल्या तपासात त्याला मोबाइल सातत्याने यूट्यूबवर वेगवेगळे व्हिडीओ पाहण्याचा नाद असल्याचे समोर आले आहे. त्याने यूट्यूबसह अन्य अॅप आपल्या आईच्या मोबाईलवर डाउनलोड केले होते.

हे वाचलं का?

Guhagar: धक्कादायक, जेली चॉकलेटमुळे बालकाचा दुर्दैवी मृत्यू

गळ्यात गळफास लटकवून तो कसा काढायचा याबाबतची माहिती तो सातत्याने बघत असल्याचे मोबाइलमधून समोर आले आहे. त्यातूनच त्याने तसा प्रयत्न केल्याने त्याला अचानक गळफास लागला आणि त्याचा दुर्दैव मृत्यू झाला असल्याचे तपासात पुढे आले आहे. दरम्यान, या प्रकरणी नागपुरातील सक्करदरा पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

ADVERTISEMENT

दरम्यान, या घटनेनंतर परिसरातील सर्वच पालकांचे धाबे दणाणले आहेत. सध्या शालेय शिक्षण घेणारी मुलंही प्रचंड मोबाइलच्या आहारी गेली आहेत. ज्यामधून विविध व्हिडीओ पाहून तशाच प्रकारचे स्टंट करण्याचा प्रयत्नही ते करतात. ज्यामध्ये काही मुलांचा हकनाक बळी जात असल्याचे समोर आले आहे.

ADVERTISEMENT

पाण्याने भरलेल्या बादलीत पडून एक वर्षाच्या चिमुकल्याचा मृत्यू, भिवंडीतली घटना

पालकांना विशेष काळजी घेण्याचे आवाहन

1. मुलांच्या वर्तनामध्ये काय बदल होतोय काय नाही याकडे जाणीवपूर्वक लक्ष ठेवावं.

2. मुले मोबाइलवर कशाचे अनुकरण करतात याकडे लक्ष द्या.

3. मुले मोबाइलवर अनावश्यक अॅप डाऊनलोड करत असतील तर त्यांना ते करण्यापासून रोखण्यात यावे.

4. मोबाइलवर मुले वारंवार काय बघतात, काय नाही याकडे सुद्धा पालकांनी लक्ष देण्याची गरज आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT