कोर्टाच्या आवारात हुज्जत घातल्याप्रकरणी निलेश राणेंसह भाजप कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल
भरत केसरकर, प्रतिनिधी, सिंधुदुर्ग भाजप आमदार नितेश राणे यांचा जामीन अर्ज फेटाळल्यानंतर सिंधुदुर्ग जिल्हा न्यायालयाबाहेर झालेल्या हाय व्होल्टेज ड्रामा प्रकरणी माजी खासदार निलेश राणेंसह भाजपच्या कार्यकर्त्यांवर पोलिसांशी हुज्जत घातल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये जिल्हा अधिकारी यांच्या आदेशानुसार 5 किंवा त्यापेक्षा जास्त जमाव केल्याप्रकरणी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी 188 आणि 269, 270, तसेच पोलिसांशी […]
ADVERTISEMENT
भरत केसरकर, प्रतिनिधी, सिंधुदुर्ग
ADVERTISEMENT
भाजप आमदार नितेश राणे यांचा जामीन अर्ज फेटाळल्यानंतर सिंधुदुर्ग जिल्हा न्यायालयाबाहेर झालेल्या हाय व्होल्टेज ड्रामा प्रकरणी माजी खासदार निलेश राणेंसह भाजपच्या कार्यकर्त्यांवर पोलिसांशी हुज्जत घातल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये जिल्हा अधिकारी यांच्या आदेशानुसार 5 किंवा त्यापेक्षा जास्त जमाव केल्याप्रकरणी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी 188 आणि 269, 270, तसेच पोलिसांशी हुज्जत घातली. या प्रकरणी 186, सिंधुदुर्गनगरी पोलीस ठाण्यात मंगळवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जिल्हा न्यायालयाच्या बाहेर जमलेली भाजप कार्यकर्त्यांची गर्दी आणि आमदार नितेश राणे यांची गाडी पोलिसांनी अडवल्यानंतर पोलिसांशी भाजपा कार्यकर्त्यांची झालेली बाचाबाची आणि बेकायदेशीर जमाव करणं, सार्वजनिक ठिकाणी शांततेचा भंग करणे यासह अन्य कारणे दाखवत पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सिंधुदुर्गनगरी पोलीस ठाण्याने ही माहिती दिली. या प्रकरणी पोलिसांशी हुज्जत घेतल्याप्रकरणी आमदार वैभव नाईक यांनी या प्रकरणाला दुजोरा दिला असून याबाबत आपण सिंधुदुर्गनगरी पोलीस ठाण्यात भेट देणार आणि तक्रार देणार असल्याची माहिती आमदार वैभव नाईक यांनी दिली.
हे वाचलं का?
या संदर्भात एक पत्र मंगळवारी आमदार वैभव नाईक यांनी सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांना दिले आहे.दरम्यान या गुन्हे दाखल करण्याच्या प्रकीयेमुळे निलेश राणे आणि नितेश राणे दोघेही अडचणीत आले आहेत.
ADVERTISEMENT
भाजप आमदार नितेश राणे यांच्या अडचणी वाढल्या आहेत. कारण सिंधुदुर्ग जिल्हा न्यायालयाने नितेश राणे यांचा जामीन फेटाळला आहे. त्यामुळे आता नितेश राणेंच्या डोक्यावर अटकेची टांगती तलवार कायम आहे. नितेश राणे यांचा जामीन आधीही फेटाळण्यात आला होता. त्यानंतर त्यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. सुप्रीम कोर्टाने त्यांना सिंधुदुर्ग न्यायालयात हजर होऊन जामिनासाठी अर्ज करण्यास सांगितलं होतं. त्यामुळे नितेश राणे कोर्टात हजर झाले होते. त्यांनी जामिनासाठी अर्जही केला होता. मात्र तो आता फेटाळण्यात आला आहे. त्यामुळे नितेश राणेंच्या अडचणी वाढल्या आहेत.
ADVERTISEMENT
नितेश राणे यांचे वकील काय म्हणाले?
हा निकाल आम्हाला अनपेक्षित आहे. आम्हाला खात्री होती की जिल्हा सत्र न्यायालयात नितेश राणे यांना जामीन मिळेल. मात्र हा जामीन अर्ज फेटाळल्यानंतर आम्ही उद्या किंवा परवा मुंबई उच्च न्यायालयात या संदर्भात दाद मागणार आहोत पोलीस नितेश राणेंना अटक करू शकत नाहीत. कारण सर्वोच्च न्यायालयाने त्यांना दहा दिवसाचा अटक न करण्याचा संरक्षण दिले. अशी प्रतिक्रिया नितेश राणे यांचे वकील अॅडव्होकेट सतीश मानशिंदे यांनी दिली आहे
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT