Satara: खळबळजनक… BJP माजी आमदाराच्या बंगल्याजवळ सापडला मृतदेह

इम्तियाज मुजावर

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

Dead body found near bungalow of a former bjp mla Kanta tai Nalawade: सातारा: साताऱ्यात (Satara) वाढे गावानजीक असलेल्या आरफळ फाटा रोडवर एका बंगल्याच्या आवारात मातीच्या ढिगाऱ्यात अर्धवट पुरलेला मृतदेह सापडल्याने मोठी खळबळ उडाली आहे. भाजपच्या माजी आमदार कांताताई नलावडे (former bjp mla kanta tai nalawade) यांच्या बंद असलेल्या बंगल्याच्या मागील परिसरात स्वच्छता सुरू असताना कुजलेल्या अवस्थेत हा मृतदेह आढळून आला आहे. (a decomposed body was found near bungalow of a former bjp mla kanta tai nalawade)

ADVERTISEMENT

हा प्रकार घातपात असल्याचा संशय व्यक्त केला जात असून घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी जमा झाली होती. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी तालुका आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस दाखल झाले असून हा घातपात असण्याचा प्रकार असून हा मृतदेह महिलेचा असल्याचे बोलले जात आहे.

Tunisha Sharma Death : तुनिषा शर्माची आत्महत्या की हत्या? पोलिसांना खुनाचा संशय

हे वाचलं का?

भाजपच्या माजी आमदार कांताताई नलावडे यांच्या बंद बंगल्यामागे मृतदेह आढळून आल्याचे वृत्त समजताच पोलिसांचे पथक तातडीने घटनास्थळी पोहोचले. मृतदेह अनेक दिवस जुना असल्याने अत्यंत कुजलेल्या अवस्थेत होता. त्यामुळे आता या मृतदेहाची नेमकी ओळख पटविण्याचं मोठं आव्हान सातारा पोलिसांसमोर असणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, साफसफाईचे काम सुरु असताना हा मृतदेह सापडला असल्याचे सांगण्यात येत आहे. यानंतर तत्काळ पोलिसांना माहिती देण्यात आली. दरम्यान ही बातमी परिसरात पसरली आणि अनेक लोक तेथे पोहोचले. त्यामुळे या गर्दीला घटनास्थळावरून हटवण्यासाठी पोलिसांना बरेच प्रयत्नही करावे लागले.

ADVERTISEMENT

Mumbai Murder : मुंबईत अभिनेत्रीची पोटच्या मुलाने केली हत्या, नदीत फेकला मृतदेह; कारण…

ADVERTISEMENT

मृतदेहाची ओळख पटविण्याचं आव्हान

हा मृतदेह नेमका कोणाचा आहे याबाबत सध्या कोणतीही माहिती मिळालेली नाही. मात्र, एका महिलेचा हा मृतदेह असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यामुळे आता ही नेमकी महिला कोण होती तिची ओळख पटविण्याचे प्रयत्न पोलिसांनी सुरू केले आहेत. सध्या पोलीस आजूबाजूच्या लोकांची चौकशी करत आहेत. यासोबतच इतरही पुरावे गोळा करण्यात येत आहेत.

दरम्यान, भाजपच्या माजी आमदाराच्या बंगल्याच्या परिसरात अशाप्रकारे मृतदेह आढळून आल्याने आता या प्रकरणाचं गांभीर्य प्रचंड वाढलं आहे. त्यामुळे सध्या सातारा पोलीस या प्रकरणाचा कसून तपास करत आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT