बापरे! नऊ वर्षाच्या मुलीला आला हार्टअटॅक; करावी लागली बायपास सर्जरी

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

अवघ्या नऊ वर्षाच्या मुलीला ह्रदयविकाराचा झटका आला त्यामुळे तिच्यावर बायपास शस्त्रक्रिया करण्यात आल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. सोलापुर जिल्ह्यातील अवनी नकाते या 9 वर्षाच्या मुलीवर ही शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. इतक्या कमी वयात तिला हार्ट अटॅक आल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे तिच्यावर बायपास शस्त्रक्रिया करणं, हाच पर्याय उरला होता. तिच्यावर मुंबई येथे यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. ही दुर्मिळातील दुर्मिळ घटना असल्याचं डॉक्टर म्हणाले.

ADVERTISEMENT

65 वर्षाच्या वृध्दासारखं आहे अवनीचं ह्रदय

काही दिवसांपूर्वी अवनी खेळत असताना तिला छातीत दुखू लागलं. त्यामुळे तिला रुग्णालयात नेलं असता तिला तीव्र ह्रदय विकाराचा झटका आला होता. डॉक्टरांनी काही चाचण्या केल्या असता तिचा हृदय हा 65 वर्षांच्या वृध्दासारखा कमकुवत आहे. त्यामुळे तिच्यावर बायपास शस्त्रक्रिया करण्याशिवाय पर्याय नाही, असं डॉक्टरांनी सांगितलं. त्यामुळे तिच्या पालकांनी तात्काळ मुंबई गाठली. मुंबईतील डॉक्टरांनी ताबडतोब तिच्यावर बायपास सर्जरी केली. सर्जरी नंतर अवनीला नवजीवन मिळाले आहे.

हे वाचलं का?

कोलेस्ट्रॉल लेव्हल गेलं होतं 600 च्या पार

अवनीवर उपचार केलेले डॉक्टर शिवप्रकाश कृष्णनाईक म्हणाले कि, अवनीला हायपकोलेस्ट्रोलमिआ आहे. यामुळे अवनीची कोलेस्ट्रोल पातळी वाढते आणि त्यामुळे तिला हार्टअटॅकचा मोठा धोका संभवतो. छातीमधील दुखण्याचं नेमकं कारणंही हेच होतं, असे डॉक्टर कृष्णनाईक म्हणाले. जिथे नॉर्मल कोलेस्ट्रॉल लेव्हल 150 ते 200 mg/dl इतकं असायला हवं, तेच अवनीच्या बाबती 600 पेक्षा जास्त असल्याचे डॉक्टर कृष्णनाईक म्हणाले. आपण 30 वर्षांच्या करियरमध्ये पहिल्यादांच अशी केस हाताळतोय. अवनीला झालेला हा आजार जेनेटीक असण्याची जास्त शक्यता असल्याचंही ते म्हणाले. पण लहान मुलांमध्ये एका वृद्ध व्यक्तीसारखं हृदय आढळून आल्याचं मी याआधी कधीच पाहिलं नसल्याचे डॉक्टरांनी सांगितलं.

ADVERTISEMENT

आयुष्यभर घ्यावे लागणार औषधे

ADVERTISEMENT

आता शस्त्रक्रियेमुळे अवनीला जीवदान मिळालं आहे. मात्र, तिला कोलेस्ट्रॉल वाढू नये, म्हणून आयुष्यभर काळजी घ्यावी लागणार आहे. त्याचबरोबर खाण्यात विविध पथ्य पाळत औषधांवर अवलंबून राहावं लागणार आहे. वेळीच निदान झाल्याने बायपास शस्त्रक्रिया करता आली. अन्यथा धोका वाढू शकला असता, डॉक्टरांनी सांगितलं.

ह्रदयविकार देशात चिंतेचा विषय

सध्या बदलत्या जीवनशैलीमुळे विविध विकार माणसांना होत आहेत. त्यात जो पूर्वी 50-60 वयादरम्यान होणारे ह्रदयविकाराच्या समस्या लवकरच होऊ लागल्या आहेत. अवघ्या तिशीतील तरुणांना उच्च रक्तदाबाच्या समस्यांना सामोरं जावं लागत आहे. कमी वयातच तरुणांना हृदयाशी संबंधी विकारांना सामोरं जावं लागत आहे. यासर्वांना बदलती जीवनशैली कारणीभूत असल्याचं डॉक्टर सांगतात.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT