हिंगोली : ट्रक चालकाचा एक्सिलेटर वायरला गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळल्यामुळे खळबळ

मुंबई तक

ADVERTISEMENT

mumbaitak
mumbaitak
social share
google news

वसमत तालुक्यातील करनेरगाव येथे एका ट्रक मालकाचा पाठीमागच्या बाजूला एक्सिलेटर वायरने गळफास घेतलेला मृतदेह आढळून आला आहे. संजय हनुमंते असं मयत व्यक्तीचं नाव असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

ADVERTISEMENT

पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार.वसमत तालुक्यातील कनेरगाव येथील संजय हनुमंते स्वतः ट्रक चालक,मालक असून ते गावातील शेती माल, साहित्य, वाहतूकची काम करत. मात्र आज सकाळच्या सुमारास संजय यांचा मृतदेह ट्रक च्या पाठीमागील बाजूस फालकाला एक्सीलेटर वायरने गळफास घेतलेल्या अवस्थेत गावाकऱ्यांना आढळून आला.

घटनेची माहिती मिळताच वसमत ग्रामीण पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विलास चवळी आणि त्यांच्या टीमने घटना स्थळी जाऊन पाहणी केली.त्यानंतर श्वान पथकालाही पाचारण करण्यात आले.

हे वाचलं का?

घटना स्थळाची बारकाईने पाहणी केल्या नंतर मृतदेह उत्तरीय तपासणी करिता वसमत येथील उप जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.अद्याप या संदर्भात पोलीस ठाण्यात कुठलीही नोंद झाली नाही. मात्र संजय हनुमंते यांनी आत्महत्या केली असावी असं प्रथमदर्शनी स्पष्ट होत असल्याचे पोलिसांनी सांगितले.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT