Satara Crime News : घराबाहेर झोपलेल्या तरुणाला अज्ञाताकडून गळा चिरुन खून

मुंबई तक

सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यात शिवंचा मळा भागात घराबाहेर झोपलेल्या एका तरुणाला अज्ञात व्यक्तीने गळा चिरुन खून केला आहे. मंगळवारी सकाळी ही घटना उघडकीस आली आहे. लोणंद पोलिसांनी या घटनेचा तपास सुरु केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार फलटण तालुक्यापासून साधारण दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या शिवंचा मळा भागात राहणारा राहुल मोहीते (वय 31) हा तरुण घरासमोरच झोपला होता. […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यात शिवंचा मळा भागात घराबाहेर झोपलेल्या एका तरुणाला अज्ञात व्यक्तीने गळा चिरुन खून केला आहे. मंगळवारी सकाळी ही घटना उघडकीस आली आहे. लोणंद पोलिसांनी या घटनेचा तपास सुरु केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार फलटण तालुक्यापासून साधारण दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या शिवंचा मळा भागात राहणारा राहुल मोहीते (वय 31) हा तरुण घरासमोरच झोपला होता. यावेळी अज्ञात व्यक्तीने त्याची गळा चिरुन हत्या केली. राहुल याच्या गळ्यावर धारदार शस्त्राने मोठा घाव घातल्याने जखम खोलवर गेल्याची माहिती पोलिसांनी दिली. मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्यामुळे अखेरीस राहुलचा जागेवरच मृत्यू झाला.

पोलिसांनी पंचनामा सुरु केला असुन राहुल मोहिते हा तरूण ट्रक ड्रायव्हर म्हणून काम करीत होता. त्याचे लग्न झाले नव्हते. त्याच्या कुंटुबात आई, वडील, भाऊ, भावजय असल्याचे सांगण्यात आले. राहुल याचा खून कोणत्या कारणासाठी केला असावा याचा तपास लोणंद पोलीस करत आहेत. घटनास्थळी पोलीस अधिक्षक तानाजी बरडे यांनीही भेट देऊन तपासासाठी सूचना केल्या आहेत.

हे वाचलं का?

    follow whatsapp