आमदाराने 9 तासात तीन वेळा बदलला पक्ष अन् सुरु झाला पक्षांतर बंदी कायद्याचा प्रवास

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) शिवसेनेविरोधात बंड केल्यानंतर महाराष्ट्रातील राजकारण ढवळून निघाले आहे. या अगोदरही नारायण राणे, राज ठाकरे, छगन भुजबळ यांनी बंड केले होते. एकनाथ शिंदेंनी शिवसेनेच्या आमदरांना फोडत गुवाहटीमधिल एका हॉटेलमध्ये ठेवले आहे. शिंदेंच्या या बंडानंतर इतिहासातील अनेक गोष्टींवर प्रकाश टाकला जात आहे. यामध्ये प्रामुख्याने पक्षांतर बंदी कायद्यावर चर्चा केली जातीये.

ADVERTISEMENT

१९८५ ला राजीव गांधी पंतप्रधान असताना पक्षांतर बंदी कायदा पारित करण्यात आला होता. परंतु पक्षांतराची पहिली ठिणगी १९६७ मध्ये हरियाणामध्ये पडली होती. ‘आया राम गया राम’ हा वाक्यप्रचार आपण अनेकदा ऐकलेला आहे, परंतु त्याचा उगम हा हरियाणातील एका राजकीय घटनेशी आहे आणि त्याच घटनेबद्दल आपण सविस्तर जाणून घेणार आहोत.

असा जन्म झाला ‘आया राम गया राम’ वाक्यप्रचाराने

हे वाचलं का?

‘आया राम गया राम’ ही भारतीय राजकारणातील नवीन टर्म नाहीये. ही टर्म मुख्यत्वे अशा नेत्यांसाठी वापरली जाते जे एका पक्षातून दुसऱ्या पक्षात उड्या मारत असतात. अनेकदा हा शब्द बंडखोर आमदार, खासदारांसाठी देखील वापरतला जातो. हरियाणाच्या एका आमदाराने एका दिवसात तीन वेळा पक्ष बदलला आणि ‘आया राम, गया राम’ या वाक्यप्रचाराने जन्म घेतला, ज्याला इंग्रजीत ‘पार्टी-स्विचिंग’ असे म्हणतात.

ही घटना 1967 ची आहे जेव्हा हरियाणामध्ये पहिल्यांदा विधानसभा निवडणुका होणार होत्या. गया लाल नावाचे अपक्ष आमदार या निवडणुकीत आमदार म्हणून निवडून आले होते. तेव्हा हरियाणामध्ये 81 सदस्यांची विधानसभा होती. गया लाल हसनपूर विधानसभा मतदारसंघातून निवडून आले होते.

ADVERTISEMENT

९ तासात ३ वेळा बदलला पक्ष

ADVERTISEMENT

निवडून आल्यानंतर काही तासांत अपक्ष असलेले गयालाल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये सामील झाले. काही तासातंच गयालाल यांनी पक्ष बदलला आणि ते युनायटेड फ्रंट युतीमध्ये सामील झाले, परंतु ते तिथेही रमले नाहीत. संध्याकाळपर्यंत गयालाल यांनी पुन्हा काँग्रेस पक्षात प्रवेश केला. 9 तासात गयालाल यांनी तीनदा पक्ष बदलला. ही भारताच्या राजकारणातील पहिलीच घटना आहे जिथे एखाद्या आमदाराने तीनदा पक्ष बदलला आहे.

संध्याकाळी काँग्रेस नेते राव बिरेंदर सिंग यांनी चंदीगडमध्ये गया लाल यांच्या बाजूने पत्रकार परिषद घेतली आणि माध्यमांना म्हणाले, “गया राम अब आया राम है.” राव बिरेंदर सिंग यांच्या या प्रसिद्ध वन-लाइनरनंतर माध्यमांनी “आया राम गया राम” हे वाक्य उचलले आणि आजपर्यंत, भारतीय राजकारणात वारंवार या पक्षातून त्या पक्षात उडी मारणाऱ्या नेत्यांसाठी याचा वापर केला जातो. पण हरियाणाच्या राजकारणात “आया राम गया राम” हा एकमेव प्रसंग नव्हता.

भजनलाल यांनी तर हद्दच केली

२८ जून १९७९ रोजी भजनलाल यांनी हरियाणामध्ये जनता पक्षाचे सरकार स्थापन केले. १९८० मध्ये इंदिरा गांधींनी लोकसभा निवडणुकीत विजय मिळवला तेव्हा भजनलाल यांनी मात्र १९८० मध्ये काँग्रेसमध्ये उडी घेतली. एकाच फटक्यात भजनलाल आपल्या सर्व आमदारांसह काँग्रेस पक्षात दाखल झाले. तेव्हापासून, भजनलाल यांना भारतीय राजकारणात ‘आया राम गया राम’ या प्रवृत्तीचे जनक मानले जाते.

इथून सुरु झाला पक्षांतरविरोधी कायद्याचा प्रवास

इंदिरा गांधींच्या हत्येनंतर राजीव गांधी देशाचे पंतप्रधान झाले. पक्षातील हे बंड थांबवण्यासाठी राजीव गांधी सरकारने 1985 मध्ये पक्षांतरविरोधी कायदा आणला. राजीव गांधी यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस पक्षाने लोकसभेत ४०४ जागा जिंकल्या होत्या. पक्षांतरविरोधी कायदा पास करण्यासाठी राजीव गांधींनी या बहुमताचा वापर केला. राज्यघटनेच्या अनुसूची १० मध्ये पक्षांतरविरोधी कायदा टाकण्यात आला.

पक्षांतरविरोधी कायद्याने अशा बंडखोरांना रोखण्याचा प्रयत्न करण्यात आला. पक्षांतर विरोधी कायद्याने अशी प्रक्रिया मांडली ज्याद्वारे पक्षांतराच्या कारणास्तव आमदारांना अपात्र ठरवले जाऊ शकते. पक्ष बदलणारा आमदार किंवा नेता पक्षांतर विरोधी कायदा टाळू शकतो, जेव्हा एखाद्या पक्षाच्या दोन तृतीयांश आमदारांनी दुसरा गट स्थापन केला किंवा दुसऱ्या कोणत्या पक्षात विलीन केला. जर दोन तृतीयांश संख्याबळ नसेल तर आमदारांना अपात्र ठरवले जाऊ शकते. पक्षांतर फक्त भारतातंच होते असे नाही, हे जगभर घडते. ऑस्ट्रेलियामध्ये पार्टी स्विचिंगसाठी वापरल्या जाणार्‍या शब्दाला ‘वाका-जंपिंग म्हणतात’.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT