अब्दुल सत्तारांचे सुप्रिया सुळेंच्या विरोधात अपशब्द, राज्यभरात राष्ट्रवादी आक्रमक

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

महाराष्ट्राचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याबाबत अपशब्द वापरल्यानंतर आता राज्यभरात राष्ट्रवादी आक्रमक झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून अब्दुल सत्तार यांच्या राजीनाम्याची मागणी होते आहे. तसंच राष्ट्रवादीच्या नेत्यांनीही अब्दुल सत्तार यांच्यावर कडाडून टीका केली आहे.

ADVERTISEMENT

राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी काय म्हटलं आहे?

अब्दुल सत्तार यांनी सुप्रिया सुळे यांच्या बद्दल केलेल्या शिवीगाळाचा मी निषेध व्यक्त करतो अब्दुल सत्तार यांच्या हा संस्काराचा परिणाम आहे. ज्यांच्या आई-वडिलांनी संस्कार दिले नाही तोच असं बोलू शकतो…अशी टीका राष्ट्रवादीचे नेते आमदार एकनाथ खडसे यांनी केली आहे. अब्दुल सत्तार यांनी माफी मागून आपले शब्द मागे घ्यावे अशी मागणी ही एकनाथ खडसे यांनी केली आहे.

राष्ट्रवादीच्या नेत्या रूपाली पाटील यांनी काय म्हटलं आहे?

अब्दुल सत्तार यांनी हे वक्तव्य करून त्यांची विकृती दाखवून दिली. महिलांना शिवीगाळ करणाऱ्या मंत्र्यांचा निषेध असो असं रूपाली पाटील यांनी म्हटलं आहे.

हे वाचलं का?

मुंबईत राष्ट्रवादीचं आंदोलन

मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसने अब्दुल सत्तार यांच्या घराबाहेर येत आंदोलन केलं. विद्या चव्हाण यांच्या नेतृत्त्वात हा मोर्चा निघाला होता. अब्दुल सत्तारांच्या बंगल्याची तोडफोड करण्यात आली. तसंच अब्दुल सत्तार यांच्या राजीनाम्याचीही मागणी यावेळी करण्यात आली.

अब्दुल सत्तार यांचा राजीनामा घ्यावा जयंत पाटील यांची मागणी

मंत्री अब्दुल सत्तार यांनी खासदार सुप्रियाताई सुळे यांच्याविषयी केलेले वक्तव्य अत्यंत दुर्दैवी आणि निषेधार्ह आहे. महिला लोकप्रतिनिधी विषयी गलिच्छ भाषेत बोलून सत्तार यांनी त्यांच्या मागास मनोवृत्तीचे दर्शन घडवले आहे.सत्तार यांनी यापूर्वी देखील अनेक वादग्रस्त वक्तव्ये केलेली आहेत. मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी त्वरित अब्दुल सत्तार यांचा राजीनामा घ्यावा

ADVERTISEMENT

निलेश लंके यांनी काय म्हटलं आहे?

कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी अक्षेपहार्य वक्तव्य केले त्यानंतर सर्वच स्थरातुन सत्तार यांच्यावर टिका होत आहे पारनेरचे राष्टवादीचे आमदार निलेश लंके यांनी अब्दुल सत्तार यांच्यावर टिका केली महिलांचा अपमान केसा केला जातो अब्दुल सत्तार  मंत्र्यांनी सुप्रिया सुळे यांच्या बद्दल जो काही अपशब्द काढला अब्दुल सत्तार हे एक सरडा आहे त्याला सत्तेचा जास्त माज आला आहे तू नगर जिल्ह्यातून कसा जातो हेच पाहतो नगर जिल्ह्यातुन पोलीस बंदोबस्तासह जरी गेला तरी तुझ्या गाड्या फोडणार असा इशारा पारनेरचे आमदार निलेश लंके यांनी दिला आहे 

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT