ठाकरेंच्या शिलेदाराचे नातेवाईकही अडचणीत येणार? ACB ने मागविली माहिती!
ACB seeks information of shivsena (ubt) mla nitin deshmukh’s relative’s property information अकोला : बाळापुरचे आमदार नितिन देशमुख (Nitin Deshmukh) यांना लाच-लुचपत विभागाने चौकशी सुरु केली आहे. देशमुख यांच्याविरोधात बेहिशेबी मालमत्ता प्रकरणात तक्रार आल्यानंतर ही चौकशी सुरु करण्यात आली आहे. १७ जानेवारीला चौकशीही झाली. अशातच आता देशमुख यांच्या इतर नातेवाईकांच्या मालमत्ता खरेदी-विक्रीचाही शोध घेणं एसीबीने सुरु केलं […]
ADVERTISEMENT
ACB seeks information of shivsena (ubt) mla nitin deshmukh’s relative’s property information
ADVERTISEMENT
अकोला : बाळापुरचे आमदार नितिन देशमुख (Nitin Deshmukh) यांना लाच-लुचपत विभागाने चौकशी सुरु केली आहे. देशमुख यांच्याविरोधात बेहिशेबी मालमत्ता प्रकरणात तक्रार आल्यानंतर ही चौकशी सुरु करण्यात आली आहे. १७ जानेवारीला चौकशीही झाली. अशातच आता देशमुख यांच्या इतर नातेवाईकांच्या मालमत्ता खरेदी-विक्रीचाही शोध घेणं एसीबीने सुरु केलं आहे. (ACB seeks information of shivsena (ubt) mla nitin deshmukh’s relative’s property information)
आमदार देशमुख यांच्या मालमत्ता खरेदी-विक्रीचा शोध घेऊन कागदपत्रे सादर करण्यासंदर्भात अमरावती एसीबीनं अकोला जिल्ह्यातील पातूर तहसीलदारांना पत्र लिहिलं आहे. देशमुख यांचं मुळगाव ‘सस्ती’ हे पातूर तालुक्यात आहे. देशमुख यांचे भाऊ, बहिण, आई, पत्नी, मुलगा, मुलगी यांच्या नावाने संपत्ती घेतली असल्यास त्याबाबत शोध घेऊन माहिती सादर करण्यासचे निर्देश पातूर तहसीलदारांना देण्यात आले आहेत.
हे वाचलं का?
Mood Of the Nation: भारतीयांच्या मनात काय?, देशाच्या राजकारणाची दिशा बदलणारा सर्व्हे
दरम्यान, याबाबत बोलताना आमदार देशमुख म्हणाले, एसीबीने पातूर तहसीलदारांना माझ्या नातेवाईकांच्या संदर्भात संपूर्ण माहिती मागिवली. निश्चितपणे तालुक्यातील तहसीलदार ही माहिती देतील. पण माझी हिशोबी मालमत्तेच्या तक्रारीमध्ये माझा पुण्याला बंगला असल्याचं, मुंबईला फ्लॅट असल्याचं सांगितलं आहे आणि याचीही चौकशी झाली पाहिजे. त्यामुळे राज्यातील सर्व जिल्हाधिकारी आणि तहसीलदारांना आपल्या संपत्तीचा तपास करण्याचे आदेश द्यावे असा टोला त्यांनी लगावला आहे.
ADVERTISEMENT
Mood of the Nation: भारत जोडो यात्रा मोदींच्या सत्तेला सुरुंग लावेल का?
ADVERTISEMENT
नितीन देशमुख हे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे अत्यंत निष्ठावंत आमदार म्हणून ओळखले जातात. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडाला साथ न देता गुवाहटीच्या रस्त्यातून नितीन देशमुख पळून आले होते. शिंदे गटाने सुरतला पळवून नेत गुवाहटीला जाण्यासाठी दबाव आणला, मात्र मी तिथून पळून आल्याचं नितीन देशमुख यांनी सांगितलं होतं.
राजन साळवी, वैभव नाईक यांचीही सुरु आहे चौकशी :
दरम्यान, नितीन देशमुख यांच्यापूर्वी डिसेंबर महिन्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे राजापूरचे आमदार आणि उपनेते राजन साळवी आणि आमदार वैभव नाईक यांनाही बेहिशेबी मालमत्ता प्रकरणात नोटीस देण्यात आली आहे. हे दोन्ही आमदार लाच-लुचपत प्रतिबंधक विभागाच्या रडारवर आले आहेत.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT