अमरावतीत अल्पवयीन मुलीवर बलात्कार, आरोपीला पोलिसांनी केली अटक

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

धनंजय साबळे, प्रतिनिधी, अमरावती

ADVERTISEMENT

अमरावतीत एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाला आहे. पीडित मुलगी गरोदर राहिल्याने हे प्रकरण समोर आले आहे. अमरावतीतल्या भातुकली गावात खोलापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत ही घटना घडली आहे. ही मुलगी गर्भवती असल्याचं समोर आल्यानंतर ही घटना समोर आली आहे. या प्रकरणी आरोपी अभिजित हुले याने संधी साधून तिच्या घरी जाऊन तिच्यावर बलात्कार केला.

अल्पवयीन मुलीला त्रास होऊ लागला. त्यामुळे तिला रूग्णालयात दाखल करण्यात आलं. रूग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर ही मुलगी गरोदर असल्याचं समोर आलं.

हे वाचलं का?

खोलापूर पोलीस स्टेशन अंतर्गत घडलेल्या अल्पवयीन मुलीच्या अत्याचार प्रकरणी पीडित यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी पोस्को अंतर्गत गुन्हा नोंदविला आहे. यासंदर्भात अधिक तपास खोलापूर पोलिस करत आहेत.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

गेल्या वर्षी पोलिस अधीक्षकांनी दिलेल्या माहितीमध्ये अमरावतीच्या ग्रामीण भागात सन 2020-21 मध्ये 19 अत्याचाराच्या घटना घडल्या आहेत. तर 74 विनयभंगाच्या गुन्ह्याची नोंद पोलिसात दाखल आहे. चालू वर्षाचा महिना लोटताच पुन्हा एकदा अत्याचाराच्या घटना पुढे येत असल्याने अमरावतीत अल्पवयीन मुली असुरक्षित असल्याचं पुन्हा एकदा समोर आल आहे. अमरावती जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करणाऱ्या महिला असून महिला राज अमरावती मध्ये असताना महिला कितपत सुरक्षित आहेत याकडे सुद्धा लक्ष देणे गरजेचे आहे. अमरावतीत अत्याचाराच्या घटना वाढत असल्याने याला आळा घालण्यासाठी प्रशासनाने “ॲक्शन प्लॅन” आखणं गरजेचं आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT