शिवसेना शाखाप्रमुखाच्या हत्या प्रकरणातील आरोपीला 6 वर्षांनंतर अटक; कोल्हापुरात ठोकल्या बेड्या
कोल्हापूर: ‘कानून के हाथ लंबे होते है’ असा डॉयलॉग हिंदी सिनेमात नेहमी ऐकायला मिळतो. गुन्हा केल्यानंतर शिक्षा चुकवण्यासाठी कितीही पळालं तरी कधीतरी पोलीस तुमच्यापर्यंत पोहोचताच. अशी एक घटना समोर आली असून, शिवसेना शाखाप्रमुखाची हत्या प्रकरणातील फरार आरोपीला तब्बल सहा वर्षानंतर अटक करण्यात यश आलं आहे. आरोपीला कोल्हापुरात अटक केल्यानंतर बदलापूर पोलिसांच्या हवाली करण्यात आलं. सागर […]
ADVERTISEMENT
कोल्हापूर: ‘कानून के हाथ लंबे होते है’ असा डॉयलॉग हिंदी सिनेमात नेहमी ऐकायला मिळतो. गुन्हा केल्यानंतर शिक्षा चुकवण्यासाठी कितीही पळालं तरी कधीतरी पोलीस तुमच्यापर्यंत पोहोचताच. अशी एक घटना समोर आली असून, शिवसेना शाखाप्रमुखाची हत्या प्रकरणातील फरार आरोपीला तब्बल सहा वर्षानंतर अटक करण्यात यश आलं आहे. आरोपीला कोल्हापुरात अटक केल्यानंतर बदलापूर पोलिसांच्या हवाली करण्यात आलं.
ADVERTISEMENT
सागर कांबळे, असं हत्या प्रकरणातील सहा वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीचं नाव आहे. ठाणे शहर पोलिसांनी त्याला अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीप्रमाणे बदलापूर शहरातील शिवाजी चौक परिसरातील शिवसेनेचे उपशाखाप्रमुख केशव नारायण मोहिते यांची 2015 मध्ये हत्या करण्यात आल्याची घटना घडली होती.
4 एप्रिल 2015 रोजी जमावाने उपशाखाप्रमुख केशव नारायण मोहिते यांची क्रूरपणे हत्या केली होती. वैयक्तिक वादातून ही हत्या करण्यात आल्याचं त्यावेळी समोर आलं होतं. त्यावेळी या प्रकरणाची तपास करत असताना पोलिसांनी चार आरोपींना अटक केली होती.
हे वाचलं का?
Maharashtra: Thane City Police says it has arrested an accused who was on the run since 2015 in the murder case of Shiv Sena leader Keshav Narayan in Badlapur. pic.twitter.com/72sVHdINTk
— ANI (@ANI) October 13, 2021
पोलिसांनी आरोपींविरुद्ध अटकेची कारवाई हाती घेण्यात आल्यानंतर आरोपी सागर कांबळे पळून जाण्यात यशस्वी ठरला होता. 2015 पासून स्थानिक पोलीस त्याचा शोध घेत होते.
दरम्यान, आरोपी सागर कांबळे कोल्हापुरात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी कोल्हापुरात आरोपी कांबळेच्या मुसक्या आवळल्या. त्यानंतर त्याला पुढील कारवाईसाठी बदलापूर पोलिसांच्या हवाली करण्यात आलं.
ADVERTISEMENT
जामिनासाठी मदत न केल्याच्या रागातून तरुणाची हत्या, आरोपीला गुजरातमधून अटक
ADVERTISEMENT
गेले अनेक वर्ष बदलापूर पोलीस हे सागर कांबळेचा शोध घेत होते. मात्र, तो सातत्याने पोलिसांना गुंगारा देण्यात यशस्वी ठरत होता. मात्र, पोलिसांनी देखील आरोपीचा शोध घेणं सोडलं नाही. त्यामुळे तब्बल सहा वर्षानंतर आरोपी पोलिसांना जाळ्यात सापडला.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT