किर्ती मोटे हत्याकांड: आईला एका दिवसाची पोलीस कोठडी, भावाला बाल न्यायमंडळात पाठवण्याचे आदेश

मुंबई तक

संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडणाऱ्या किर्ती मोटे हत्याकांडाप्रकरणी आरोपी आईला वैजापूर न्यायालयाने एका दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणात दुसरा आरोपी म्हणजे किर्तीचा भाऊ हा सज्ञान असल्याचं सिद्ध करण्यात सरकारी पक्षाला अपयश आल्यामुळे त्याला बाल न्यायमंडळासमोर हजर करण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत. गोयेगाव येखील किशोरी उर्फ किर्ती मोटे आणि अविनाश थोरे यांनी सहा महिन्यांपूर्वी प्रेमविवाह […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडणाऱ्या किर्ती मोटे हत्याकांडाप्रकरणी आरोपी आईला वैजापूर न्यायालयाने एका दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणात दुसरा आरोपी म्हणजे किर्तीचा भाऊ हा सज्ञान असल्याचं सिद्ध करण्यात सरकारी पक्षाला अपयश आल्यामुळे त्याला बाल न्यायमंडळासमोर हजर करण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत.

गोयेगाव येखील किशोरी उर्फ किर्ती मोटे आणि अविनाश थोरे यांनी सहा महिन्यांपूर्वी प्रेमविवाह केला होता. किर्तीच्या कुटुंबातील सदस्यांचा या लग्नाला तीव्र विरोध होता. मुलीने पळून जाऊन लग्न केल्यामुळे समाजात आपली बदमानी होत असल्यामुळे संतापलेल्या आई आणि भावाने किर्तीच्या सासरी जाऊन तिची हत्या केली. आरोपी भावाने बहिणीच्या गळ्यावर कोयत्याने वार करत तिचं मुंडक छाटलं. या गुन्ह्यानंतर दोन्ही आरोपी पोलिसांसमोर हजर झाले.

वैजापूर न्यायालयात प्रथमवर्ग दंडाधिकारी एस.एस.निचळ यांच्यासमोर आरोपीला हजर करण्यात आलं असता न्यायालयाने मुलीची आई शोभा मोटेला एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली. दरम्यान ५ डिसेंबरच्या रात्री उशीरापर्यंत कागदपत्रांची तपासणी केली असता भावाचं वय १८ वर्ष ७ महिने असल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालं. परंतू बचाव पक्षाचे वकील प्रमोद जगताप यांनी आरोपी अल्पवयीन असल्याचे पुरावे न्यायालयासमोर सादर केले. यावेळी न्यायालयाने ग्रामपंचायतीचा जन्मदाखला ग्राह्य धरत आरोपी भावाला बाल विधीमंडळासमोर हजर करण्याचे आदेश दिले आहेत.

भावाने कोयत्याचे वार करत बहिणीचं शीर केलं धडावेगळं आणि ओरडला.. औरंगाबादच्या घटनेमुळे महाराष्ट्र हादरला

हे वाचलं का?

    follow whatsapp