Crime : पोलिसांच्या खुर्चीवर बसून केला व्हीडिओ; रीलस्टारला घडवली जन्माची अद्दल

मिथिलेश गुप्ता

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

Crime | Mumbai :

ADVERTISEMENT

डोंबिवली : पोलीस स्टेशनमध्ये अधिकाऱ्यांच्या खुर्चीवर बसून व्हिडिओ बनवणं एका रीलस्टारला चांगलचं महागात पडलं आहे. सुरेंद्र पाटील उर्फ ​​चौधरी (वय-५०) असं या रीलस्टारचे नाव आहे. काही महिन्यांपूर्वी इन्स्टाग्राम आणि सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मानपाडा पोलिसांनी या रीलस्टारवर गुन्हा दाखल करुन त्याला अटक केली होता. यानंतर पोलीस तपासात या रीलस्टारवर आणखी 7 गुन्हे दाखल असल्याचे निष्पन्न झालं होतं. त्यामुळे पोलिसांनी या रीलस्टारला नोटीस बजावत तडीपाराची कारवाई केली आहे. (Taking the opportunity to make a video sitting on the officer’s chair in the police station when no one is in the cabin has cost a reel star dearly.)

सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील कुराडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरेंद्र पाटील उर्फ चौधरी याला एक गुन्ह्यातील चौकशीसाठी पोलीस ठाण्यात बोलविण्यात आलं होतं. मात्र अधिकाऱ्यांच्या केबिनमध्ये कोणी नसल्याची संधी साधत त्याने खुर्चीवर बसून रील बनवलं. त्यावेळी त्याच्यावर गुन्हा दाखल करून अटक देखील झाली होती. मात्र मानपाडा, महात्मा फुले, कोळशेवाडी अशा विविध पोलीस ठाण्यात त्याच्यावर ७ गुन्हे दाखल असल्याने पोलिसांनी अखेर त्याला तडीपार केलं आहे.

हे वाचलं का?

Cyber Crime : जर कुरिअर सर्व्हिसबद्दल गुगलवर सर्च करत असाल तर सावधान!

ठाणे, मुंबई, मुंबई उपनगर आणि रायगड जिल्ह्यातून दीड वर्षासाठी त्याला तडीपार करण्यात आलंय. याआधी सुरेंद्रने आपल्या परवानाधारक पिस्तूलच्या गैरवापर करून त्यासंबंधीचे रिल्स ते सोशल मीडियावर व्हायरल करून कायद्याचे उल्लंघन केले होते. त्यामुळे त्याच्या या कारवाया पाहता पोलिसांनी त्याला तडीपार केलं आहे.

ADVERTISEMENT

Solapur Crime: पतीने पत्नीचा डावा कानच कापून टाकला, नेमकं काय घडलं?

ADVERTISEMENT

डोंबिवली जवळील ठाकुर्ली परिसरात राहणाऱ्या सुरेंद्र पाटील उर्फ चौधरीचे इंस्टाग्रामवर लाखो फॉलोवर्स आहेत. व्हाट्सएप स्टेटस, इंस्टाग्रामसाठी तो फिल्मी डायलॉग बोलून व्हीडिओ बनवून व्हायरल करत होता. कधी हातात बंदूक घेऊन तर महागड्या गाडीवर बसवून तो व्हिडिओ बनवायचं. काही महिन्यांपूर्वी हातात बंदूक घेतलेल्या व्हिडीओ व्हायरल झाला आणि त्यामुळे एकच खळबळ माजली होती. त्यानंतर सुरेंद्रवर गुन्हा दाखल करत त्याला अटक केली होती. त्यानंतर सुरेंद्रने माफी मागितली होती. मात्र आता त्याचा हा व्हीडिओ व्हायरल झाला होता.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT