मी त्याचा फोन का नाही घेतला?; मामाच्या निधनानंतर अभिनेता पुष्कर जोग भावूक

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

गेल्या वर्षभरापासून देशभरात कोरोनाने थैमान घातलं आहे. दिवसेंदिवस रूग्णसंख्या वाढत असल्याचं चित्र दिसून येतंय. या कठीण काळात अनेकांनी त्यांच्या जवळील व्यक्तींना गमावलं आहे. असचं मराठमोळा अभिनेता पुष्कर जोगने देखील त्याच्या जवळील व्यक्तीला गमावलं आहे.

ADVERTISEMENT

कोरोनामुळे अभिनेता पुष्करच्या मामाचं निधन झालं आहे. मामाच्या निधनाचं पुष्करला फार दुःख झालंय. पुष्करने यानंतर सोशल मीडियावर एक व्हीडियो शेअर केला आहे. या व्हीडिओच्या माध्यमातून त्याने मामाचा फोन न उचलल्याची खंत व्यक्त केली आहे.

या व्हीडिओमध्ये पुष्कर म्हणतो, “काही दिवसांपूर्वी मामाचा मला फोन आला होता. मात्र मी तो उचलू शकलो नाही. आणि दुसऱ्या दिवशी मला कुटुंबियांकडून कळलं की मामाचं निधन झालंय. त्यावेळी मला फार वाईट वाटलं. मी त्याचा फोन का नाही उचलला अशा प्रश्न सारखा मनात येत होता. अनेकदा आपण मित्रांना किंवा जवळच्या व्यक्तींना नंतर फोन करतो असं म्हणत त्यांचा फोन उचलत नाही. मात्र असं करू नका.” या व्हीडिओदरम्यान पुष्करला अश्रूही अनावर झाले आहेत.

हे वाचलं का?

या व्हीडिओच्या कॅप्शनमध्ये पुष्कर लिहीतो, “मी व्यक्त होण्याचा विचार करत होतो आज थोडी हिम्मत झाली. काही दिवसांपूर्वी माझा मामा गेल्याची पोस्ट मी टाकला होती. त्या वेळेसचा मिस्ड कॉल माझे मन अजूनही खातंय.. तुम्हा सर्वांना माझी विनंती आहे कृपा करून एकमेकांच्या संपर्कात रहा. लॉकडाऊन असल्यामुळे सर्वांशी संपर्क होत नाहीये हे योग्य नाही. हा काळ आपल्या सर्वांसाठी प्रचंड कठीण आहे तेव्हा हेवे दावे, रुसवे फुगवे, वैचारिक मतभेद सर्व काही प्लीज बाजूला ठेवा आणि आपल्या नातेवाईक, मित्र परिवार आणि आप्त स्वकीयांसह संपर्कात रहा. कॉल मेसेज तर कधीच कुणाचा मिस करू नका अशी माझी तुम्हाला सर्वांना कळकळीची विनंती आहे. लवकरच हा वाईट काळ सरेल आणि आपण सर्व पुन्हा नव्या जोमाने कामाला लागू.”

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT