‘प्रायव्हेट पार्ट दाखवून 0 ते 10 रेटिंग द्यायला सांगायचा’; साजिद खानवर शर्लिन चोप्रानं केले पुन्हा गंभीर आरोप

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

दिग्दर्शक साजिद खान हा वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. नुकताच तो बिग बॉस सिझल 16 मध्ये प्रतिस्पर्धी म्हणून सहभागी झाला आहे. त्याला बिग बॉसमध्ये पाहून अनेकजण संतापले आहेत. त्याला पाहून काहीजण नाखूष आहेत. साजिदचं नाव यापूर्वी मीटू प्रकरणात आलं होतं. त्यामुळे दिल्लीच्या महिला आयोगाच्या अध्यक्षांनी केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांना पत्र लिहून साजिद खानला बिग बॉसमधून काढून टाकण्याची मागणी केली आहे. त्यात आता अभिनेत्री शर्लिनने पुन्हा एकदा साजिदवर निशाणा साधला आहे. म्हणून साजिदच्या नावाची चर्चा होत आहे. साजिदने आपल्यासोबत विनयभंग केलाय त्यामुळे मला बिग बॉसच्या घरात जाऊ द्या, असं आवाहन तिने केलं आहे.

ADVERTISEMENT

नेमकं काय म्हणाली शर्लिन

अभिनेत्री शर्लिन चोप्रा हिने ट्विटच्या माध्यमाने साजिदवर गंभीर आरोप केले आहेत. ती म्हणाली साजिदने मला एकदा आपला प्रायव्हेट पार्ट दाखवून 0 ते 10 मध्ये रेटिंग दे, अशी विचारणा केली होती. असा गंभीर आरोप शर्लिन चोप्रानं केलं आहे. त्यामुळं आता मला बिग बॉसच्या घरात जाऊन त्याला रेटिंग द्यायची आहे, असा संताप तिने व्यक्त केलाय. विनयभंग करणाऱ्या व्यक्तीबरोबर पीडित महिला कसा व्यवहार करते, हेदेखील देशाला बघू दे. सलमान खानने यावर स्टॅन्ड घ्यायला हवा, असं म्हणत तिने आपल्या पोस्टमध्ये सलमानला टॅग केलं आहे. आता यावर बिग बॉसकडून काय पावले उचलली जातात, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

साजिदवर #MeToo प्रकरणात अनेक आरोप

हे वाचलं का?

जेव्हापासून साजिद खान वादग्रस्त रिअॅलिटी शो बिग बॉस 16 मध्ये सहभागी होणार असल्याचं बोललं जाऊ लागलं , तेव्हापासून सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे. कारण साजिद खानवर #MeToo अंतर्गत गेल्या दोन-तीन वर्षांपासून अनेक गंभीर आरोप होत आहेत. साजिदवर आपल्या पदाचा गैरफायदा घेतल्याचा आरोप करण्यासाठी अनेक अभिनेत्री आणि मॉडेल्सनी पुढे येऊन त्याच्याविरोधात आवाज उठवला होता. हे प्रकरण इतके वाढले होते की साजिदला त्याच्या ‘हाऊसफुल 4’ चित्रपटातून त्याचे नाव वगळावे लागले.

आता बिग बॉसच्या घरात गेल्यापासून शर्लिनने साजिदच्या विरोधात मोर्चा उघडला आहे. तिने यावर बोलताना इंडस्ट्रीच्या लोकांबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. एका मुलाखतीदरम्यान ती म्हणाली, शोषण करणाऱ्या अनेक लोकांना इंडस्ट्रीत काम मिळतं. ही इंडस्ट्री माफियाप्रमाणे काम करते. छेडछाड करणारे, ड्रग्जिस्ट, बलात्कारी, सेक्सिस्ट या सर्वांना अनेकदा संधी दिली जाते, कारण त्यांचा असा ठाम विश्वास आहे की प्रत्येक पाप्याचे भविष्य आहे. दुर्दैवाने, त्यांना भविष्याची फारशी पर्वा नाही. अनेकदा पीडित व्यक्ती काही कारणांमुळं शांत बसते. काही बोलत नाही. याचाच फायदा ही लोकं घेतात, असं शर्लिन म्हणाली.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT