Casting Couch : विद्या बालनच्या दाव्याने खळबळ; चेन्नईच्या हॉटेलमध्ये काय घडलं?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

Vidya Balan on Casting Couch :

ADVERTISEMENT

मुंबई : हिंदी, मराठी किंवा देशातील कोणत्याही भाषेतील चित्रपटसृष्टीत कास्टिंग काउचबद्दल अनेकदा कलाकार मोठे दावे आणि खुलासे करत असतात. याच यादीत आता अभिनेत्री विद्या बालनचं (Vidya Balan) नाव जोडलं गेलं आहे. विद्या बालन हिने अलिकडेच एका मुलाखतीत कास्टिंग काउचबद्दल खुलासा करत खळबळ उडवून दिली आहे. (Actress Vidya Balan’s big claim about Casting Couch)

विद्या बालन म्हणाली की, एका दिग्दर्शकाने तिला एका रुममध्ये एकटीला भेटण्यासाठी बोलावलं होतं, मात्र तिने हुशारी दाखवून स्वत:ला वाचवलं. त्यामुळे हा चित्रपट तिच्या हातातून गेला, पण कास्टिंग काउचची शिकार होण्यापासून वाचल्याचा आनंद असल्याचं ती म्हणाली.

हे वाचलं का?

विद्या बालन कास्टिंग काउचवर काय म्हणाली? :

ह्युमन्स ऑफ बॉम्बेला दिलेल्या मुलाखतीत विद्या बालन म्हणाली, ‘मी कधीच कास्टिंग काउचचा सामना केला नाही, यासाठी मी स्वतःला भाग्यवान समजते. मी अनेक धक्कादायक कथा ऐकल्या आहेत. जेव्हा मी चित्रपटसृष्टीत येत होते तेव्हा माझ्या आई-वडिलांना हीच सर्वात मोठी भीती होती. म्हणूनच त्यांना मी चित्रपटात काम करावं, असं वाटत नव्हतं.

पण माझ्यासोबत एक घटना घडली आहे. मला आठवतं की मी एक चित्रपट साइन केला होता आणि मला दिग्दर्शकाला भेटायचं होतं. त्याचवेळी एका जाहिरातीच्या शूटिंगसाठी मी चेन्नईला जाणार होती.

ADVERTISEMENT

Bollywood: बॉलिवूडच्या ‘या’ 10 सेलिब्रिटींचा हृदयविकाराच्या झटक्याने झालेला मृत्यू

ADVERTISEMENT

दिग्दर्शकाने खोलीत एकट्याला बोलावले :

विद्या पुढे म्हणाली, ‘दिग्दर्शकाने मला चेन्नईला आल्यावर भेटायला सांगितलं. मीही त्यावेळी त्यांना सांगितलं की, मी एका जाहिरातीच्या शूटिंगसाठी चेन्नईला येत आहे, मग भेटू. आम्ही एका कॉफी शॉपमध्ये भेटलो, पण तो दिग्दर्शक त्याच्या रुममध्ये जाऊन बोलण्यासाठी वारंवार माझ्यावर त्याच्या दबाव आणत होता.

नेमकं काय होतयं हे समजू शकत नव्हते. मी एकटी होते. पण मी हुशारी दाखवली. त्याच्या रुममध्ये पोहोचल्यावर मी दार उघडचं ठेवलं. कदाचित त्याला समजले असेल की त्याच्यासाठी एकच मार्ग आहे. या घटनेनंतर तिला चित्रपटातून काढून टाकण्यात आलं, पण आजही कास्टिंग काउचसारखी कोणतीही घटना आपल्यासोबत घडली असल्याच्या गोष्टीवर तिचा विश्वास बसत नाही.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT