नाद करा.. पण आमचा कुठं! श्रीमंतीच्या बाबतीत अंबानी-अदाणींनी झुकेरबर्गला टाकलं पिछाडीवर
फोर्ब्सने रिअल टाइम अब्जाधीशांची यादी जाहीर केली आहे. या यादीत गौतम अदानी हे सर्वात श्रीमंत भारतीय ठरले आहेत. त्यांची संपत्ती 90 अब्ज डॉलर्स इतकी आहे. त्यांच्या पाठोपाठ मुकेश अंबानी यांचा क्रमांक लागतो. 89 अब्ज डॉलर्स संपत्तीसह ते दुसऱ्या क्रमांकावर आहेत. या दोघांनीही फेसबुकचा किंग म्हणवला जाणारा मार्क झुकेरबर्ग याला मागे टाकलं आहे. कारण या यादीत […]
ADVERTISEMENT
फोर्ब्सने रिअल टाइम अब्जाधीशांची यादी जाहीर केली आहे. या यादीत गौतम अदानी हे सर्वात श्रीमंत भारतीय ठरले आहेत. त्यांची संपत्ती 90 अब्ज डॉलर्स इतकी आहे. त्यांच्या पाठोपाठ मुकेश अंबानी यांचा क्रमांक लागतो. 89 अब्ज डॉलर्स संपत्तीसह ते दुसऱ्या क्रमांकावर आहेत. या दोघांनीही फेसबुकचा किंग म्हणवला जाणारा मार्क झुकेरबर्ग याला मागे टाकलं आहे. कारण या यादीत मार्क झुकेरबर्ग बाराव्या स्थानावर आहे. मार्क झुकेरबर्गची संपत्ती 85 अब्ज डॉलर्स इतकी आहे. झुकेरबर्गकडे Meta Inc च्या अंदाजे 12.8 टक्के स्टॉक आहे. तो पूर्वी फेसबुक या नावाने ओळखला जात होता.
ADVERTISEMENT
अहवालात मिळालेल्या माहितीनुसार, Meta चे एकूण स्टॉक मूल्य 200 अब्ज USD पेक्षा जास्त क्रॅश झाले आहे. ते न्यूझीलंडच्या अर्थव्यवस्थेचा जो आकार आहे त्याच्या अंदाजे समतुल्य प्रमाणात आहे. चौथ्या तिमाहीत, Meta ने 33.67 अब्ज डॉलरची उलाढाल नोंदवली. पण त्यांनी 10.3 अब्ज डॉलर्सचा नफा कमावला आहे. हा नफा गेल्या वर्षीच्या तुलनेत सुमारे 8% कमी आहे. मेटाच्या बाजार मूल्यावर असे मोठ्या प्रमाणात घसरत असताना, अॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस यांनी अॅमेझॉनच्या वाढीव कमाईनंतर त्याच्या मूल्यांकनात सुमारे 20 अब्ज डॉलर्सची भर घातली आहे. बेझोस यांची मालकी 9.9% आहेत आणि सध्या 164 अब्ज डॉलर्स कमाई असल्याने ते जगातील तिसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत. टेस्ला इंकचे टॉप बॉस एलोन मस्क 232 अब्ज डॉलरसह या यादीत सर्वात पुढे आहेत.
मुकेश अंबानी यांची संपत्ती एकाच दिवसात 2.2 अब्ज डॉलर्सची घसरण झाल्याने त्यांचे आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्तीचे स्थानही घसरले. तर त्याच वेळी गौतम अदानींच्या संपत्तीत 672 मिलियन डॉलरची घसरण झाली होती. शेअर मार्केटमधील रोजच्या चढ-उताराचा परिणाम हा आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीवर होत असल्याचं दिसून येतंय.
हे वाचलं का?
फोर्ब्जने रिअल टाइम बिलेनियर इंडेक्स (Forbes Real Time Billionaire Index) जारी केला असून त्यामध्ये गौतम अदानी यांची संपत्ती ही 90.1 अब्ज डॉलर इतकी असल्याचं सांगितलं आहे. त्यानंतर रिलायन्सच्या मुकेश अंबानींची संपत्ती ही 89.4 अब्ज डॉलर इतकी असल्याचं नमूद केलं आहे. संपत्तीच्या बाबतीत गौतम अदानी यांनी मुकेश अंबानी यांनाच नव्हे तर मेटाच्या मार्क झुकरबर्गलाही (Mark Zuckerberg) मागे टाकलं आहे. मार्क झुकेरबर्गची संपत्ती 85 अब्ज डॉलर्स असल्याचं या यादीत म्हटलं आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT