आदित्य ठाकरेंच्या सुरक्षाव्यवस्थेत हलगर्जीपणा? ताफ्यात सरकारी ऐवजी खासगी गाड्या
रत्नागिरी : शिवसेना नेते आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे आज (शुक्रवारी) कोकण दौऱ्यावर आहेत. याची सुरुवात आज सकाळी रत्नागिरीमध्ये मोठ्या सभेने झाली. यावेळी बोलताना त्यांनी बंडखोर नेते आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उद्योग मंत्री उदय सामंत, माजी मंत्री रामदास कदम यांच्यावर टीकास्त्र डागलं. या दरम्यान आदित्य ठाकरे यांच्या सुरक्षाव्यवस्थेमध्ये मोठा हलगर्जीपणा झाल्याचा आरोप करण्यात येत […]
ADVERTISEMENT
रत्नागिरी : शिवसेना नेते आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे आज (शुक्रवारी) कोकण दौऱ्यावर आहेत. याची सुरुवात आज सकाळी रत्नागिरीमध्ये मोठ्या सभेने झाली. यावेळी बोलताना त्यांनी बंडखोर नेते आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उद्योग मंत्री उदय सामंत, माजी मंत्री रामदास कदम यांच्यावर टीकास्त्र डागलं. या दरम्यान आदित्य ठाकरे यांच्या सुरक्षाव्यवस्थेमध्ये मोठा हलगर्जीपणा झाल्याचा आरोप करण्यात येत आहे.
ADVERTISEMENT
आदित्य ठाकरे यांना झेड दर्जाची सुरक्षा आहे. या सुरक्षेमध्ये राज्याच्या गृहविभागाने सुरक्षा रक्षक दिले पण त्यांना पोलीस गाड्या दिल्या नाहीत. त्यामुळे या दौऱ्यासाठी सुरक्षा रक्षक खासगी वाहनाने आले. झेड सुरक्षेतील सुरक्षा रक्षकांना गृह विभाग गाड्या देते पण आदित्य ठाकरे यांच्या सुरक्षेसाठी आलेल्या सुरक्षा रक्षकांना गाड्या दिलेल्या नाहीत, असा आरोप करण्यात येत असून जर कायदा सुव्यवस्था बिघडला तर त्याची जबाबदारी कोणाची? असा सवाल शिवसेनेकडून विचारण्यात येत आहे.
vedanta foxconn Project : ‘तुम्ही भित्रे होतात, आम्ही 40 वार पाठीवर घेतलेत आणि आणखी घेऊ’; आदित्य ठाकरेंचा शिंदेंवर हल्ला
हे वाचलं का?
या चर्चांवर “माझ्या सुरक्षेसाठी शिवसैनिक पुरेसे आहेत” असे म्हणून आदित्य ठाकरे यांनी मात्र एकाच वाक्यात प्रतिक्रिया दिली. तसेच सुरक्षेपेक्षा फॉक्सॉकॉन प्रकल्प महत्त्वाचा, असे सांगत या डबल इंजिन सरकारचं एक इंजिन फेल झाले आहे, असेही आदित्य ठाकरे म्हणाले.
शिव संवाद यात्रा : फॉक्सकॉन प्रोजेक्ट पुन्हा महाराष्ट्रात; आदित्य ठाकरेंचं शिंदेंच्या वर्मावर बोट
ADVERTISEMENT
आदित्य ठाकरे काय म्हणाले?
आदित्य ठाकरे म्हणाले, हे गद्दार आज सांगताहेत आम्ही बंड केलं. उठाव केला. हे बंड नाही. हा उठाव नाही, ही गद्दारी आहे. तुम्ही भित्रे होतात. तुमच्यावर दडपण होती म्हणून तुम्ही पळून गेलात. तुम्ही छातीवर वार झेलण्यापेक्षा आमच्या पाठीवर वार करून निघून गेलात. ४० वार घेतलेत आणि अजून कितीही वार झेलायला तयार आहोत. हिंमत होती, तर समोरून यायला हवं होतं, अशीही टीका त्यांनी केली.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT