सचिन वाझेंचं सत्य बाहेर आलं तर ठाकरे सरकार पडेल- कंगना राणौत
प्रसिद्ध उद्योजक मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर संशयित गाडीत सापडलेल्या स्फोटकाप्रकरणी काल एपीआय सचिन वाझे यांना NIA कडून अटक करण्यात आली. सचिन वाझे यांच्या अटकेनंतर विरोधक आणि सत्तारी यांच्यामध्ये आरोप प्रत्यारोपांची मालिका सुरु झाली. तर यामध्ये आता बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौतने देखील उडी घेतली असून या प्रकरणात तिने शिवसेनेवर निशाणा साधला आहे. मोठी बातमी: 13 तासाच्या […]
ADVERTISEMENT
प्रसिद्ध उद्योजक मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर संशयित गाडीत सापडलेल्या स्फोटकाप्रकरणी काल एपीआय सचिन वाझे यांना NIA कडून अटक करण्यात आली. सचिन वाझे यांच्या अटकेनंतर विरोधक आणि सत्तारी यांच्यामध्ये आरोप प्रत्यारोपांची मालिका सुरु झाली. तर यामध्ये आता बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौतने देखील उडी घेतली असून या प्रकरणात तिने शिवसेनेवर निशाणा साधला आहे.
ADVERTISEMENT
मोठी बातमी: 13 तासाच्या चौकशीनंतर API सचिन वाझे यांना NIA कडून अटक
कंगनाने सोशल मीडियावर याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. ट्विटच्या माध्यमातून कंगनाने महाराष्ट्रातील शिवसेनेचं सरकारही पडू शकेल असं म्हटलंय. कंगणा तिच्या ट्विटमध्ये म्हणते, माझा अनुभव मला सांगतोय या प्रकरणात मोठ षडयंत्र रचलं आहे. शिवसेना सत्तेत आल्यानंतरच या पोलीस अधिकाऱ्याला निलंबित करण्यात आलं. जर या प्रकरणाचा योग्य पद्दतीने तपास केला गेला तर आरोपी नक्कीच सापडतील तसंच शिवसेनेचं सरकार देखील पडू शकेल. शिवाय यानंतर माझ्याविरोधात आणखी 200 एफआयआर दाखल होऊ शकतात. आणि मी याची मानसिक तयारी देखील केलीये. यापूर्वीही अनेकवेळा शिवसेनेविरोधात कंगनाने ट्विट्स केले होते.
हे वाचलं का?
दरम्यान तबब्ल 13 तासांच्या चौकशीनंतर एपीएय सचिन वाझे यांना अटक करण्यात आली. वाझे आयपीसी कलम 286, 465, 473, 506(2), 120 B आणि स्फोटक पदार्थ कायदा 1908 कलम 4 अ, ब अंतर्गत कारवाई करण्यात आलीय. शिवाय सचिन वाझेनंतर या प्रकरणात आणखी काही जणांना ताब्यात घेण्याची शक्यता आहे.
ADVERTISEMENT
सचिन वाझेंनंतर या प्रकरणात अजून काहींना ताब्यात घेण्याची शक्यता
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT