आधी एकनाथ शिंदेंच्या शपथेवर अन् आता विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीवर काँग्रेसचा आक्षेप

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मुंबई: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी घेतलेल्या पद आणि गोपनीयतेच्या शपथेवरती महाराष्ट्र काँग्रेसने प्रश्न उपस्थित केले आहेत. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी शिंदे यांना शिवसेनेचे संस्थापक बाळासाहेब ठाकरे आणि दिवंगत शिवसेना नेते आनंद दिघे यांची नावे घेण्यास परवानगी का दिली, असा प्रश्न काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी विचारला आहे. काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे (Atul Londhe) यांनी केलेल्या ट्विटमध्ये असे म्हटले आहे की, 2019 मध्ये महाविकास आघाडीचे सरकारचा शपथविधी होत असताना, त्यावेळी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी नेत्यांची नावे घेण्यास अडथळा आणला होता.

ADVERTISEMENT

आणि पुन्हा शपथ घेण्याचे आदेश दिले होते. त्या वेळी काँग्रेस नेते केसी पाडवी यांनी शपथ घेताना सोनिया गांधींचे नाव घेतले होते, त्यावर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी त्यांना रोखले होते. त्या घटनेचा संदर्भ देत राज्यपालांनी आपली भूमिका बदलली आहे का, असा सवाल काँग्रेस नेत्याने केला.

आता यानंतर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीवरुन प्रश्नचिन्ह उपस्थीत केले आहेत. बाळासाहेब थोरात ट्विट करत म्हणाले ”विधानसभा अध्यक्ष पदाची निवडणूक लावावी ही मागणी काँग्रेसने राज्यपालांकडे सातत्याने केली पण प्रकरण सुप्रीम कोर्टात (Supreme Court) आहे सांगूनही विधानसभा अध्यक्ष पदाची निवडणूक राज्यपालांनी घेतली नव्हती मग आता कशी निवडणूक लावली ? कोणत्या नियम अंतर्गत निवडणूक होणार? हा आमचा प्रश्न आहे.”

हे वाचलं का?

दरम्यान एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. यावेळी शिंदेंनी बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघेंचे नाव घेवून शपथेला सुरुवात केली होती त्यावरच काँग्रेसने आक्षेप घेतला आहे. दुसरी गोष्ट म्हणजे नाना पटोले यांनी अध्यक्षपद सोडल्यानंतर महाराष्ट्राच्या विधानसभेला अध्यक्ष नव्हता. नरहरी झिरवाळ हेच उपाध्यक्ष म्हणून विधानभवनात बसत होते. महाविकास आघाडीने वारंवार निवडणूक घेण्याचा प्रयत्न केला पंरतु अध्यक्षपद न्यायालयीन लढाईत अडकवले गेले असा आरोप काँग्रेस करत आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT