Airtel 5G plus ‘या’ स्मार्टफोनमध्ये आला ऑप्शन; वाचा सविस्तर बातमी

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

Airtel 5G Plus ची सेवा 8 शहरांमध्ये सुरू करण्यात आली आहे. दिल्ली, वाराणसीसह 8 शहरांतील वापरकर्त्यांना टेलिकॉम ऑपरेटरच्या 5G सेवेचा अनुभव मिळत आहे. तुम्ही दिल्ली, मुंबई, चेन्नई, बंगळुरू, हैदराबाद, सिलीगुडी, नागपूर आणि वाराणसी येथेही राहत असाल तर तुम्ही एअरटेलच्या सेवेचा लाभ घेऊ शकता.

ADVERTISEMENT

सध्या ग्राहकांना 5G सेवेसाठी कोणतेही अतिरिक्त शुल्क द्यावे लागणार नाही. तुमच्याकडे फक्त 5G फोन असणे आणि तुम्ही 5G उपलब्ध असलेल्या क्षेत्रात असणे आवश्यक आहे. यानंतरही अनेक वापरकर्ते Airtel 5Gची सेवा मिळवू शकत नाहीत. याची अनेक कारणे आहेत. अनेक ब्रँड्सच्या स्मार्टफोनमध्ये यूजर्सना 5G चा पर्याय मिळत नाही. तर युजर्सनी हे स्मार्टफोन फक्त 5G च्या नावाने खरेदी केले. आता या फोनमध्ये 5G सेवा मिळणार नाही का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

5G साठी अपडेट्सची प्रतीक्षा करावी लागेल

हे वाचलं का?

या स्मार्टफोनमध्ये ग्राहकांना 5G सेवा मिळणार नाही असे नाही. यासाठी तुम्हाला थोडी वाट पहावी लागेल. स्मार्टफोन निर्माता काही दिवसात सॉफ्टवेअर अपडेट्स जारी करतील. या अपडेटनंतर तुम्ही या स्मार्टफोन्समध्ये 5G नेटवर्क सहज वापरण्यास सक्षम असाल. या क्षणी तुम्हाला कोणत्या स्मार्टफोनमध्ये सेवा मिळेल आणि कोणत्या नाही ते आपण बघू.

या फोनमध्ये 5G उपलब्ध असेल

ADVERTISEMENT

iPhone बद्दल बोलायचे झाले तर सध्या तुम्हाला Apple च्या कोणत्याही स्मार्टफोन मध्ये 5G सपोर्ट मिळणार नाही. यासाठी तुम्हाला अपडेट इन्स्टॉल करावे लागेल. कंपनी लवकरच OTA अपडेट जारी करू शकते. त्याच वेळी, Samsung Galaxy S22 मालिका, Fold 4, Flip 4, Galaxy A53 5G, Galaxy A73 5G यासह इतर अनेक फोनमध्ये 5G सपोर्ट उपलब्ध आहे. तर इतर मॉडेल्सना अपडेटची प्रतीक्षा करावी लागेल.

ADVERTISEMENT

तुम्हाला Realme च्या बहुतांश स्मार्टफोन्समध्ये 5G सपोर्ट मिळत आहे. काही OnePlus च्या फोनमध्ये 5G तयार आहेत, तर काहींना अपडेट येण्याची प्रतीक्षा करावी लागेल. Xiaomi, iQOO चे बहुतांश स्मार्टफोन 5G साठीतयार आहेत. OPPO चे फ्लॅगशिप आणि प्रीमियम फोन 5G साठी तयार आहेत, परंतु इतरांना अपडेटसाठी प्रतीक्षा करावी लागू शकते. 5G पर्याय बहुतेक Vivo फोनमध्ये उपलब्ध आहे.

जर तुम्हाला 5G स्मार्टफोन घ्यायचा असेल आणि तुम्हाला प्रीफर्ड नेटवर्क सेटिंगमध्ये 5G नेटवर्कचा पर्याय मिळत नसेल, तर तुम्ही नवीनतम OTA अपडेटची प्रतीक्षा करावी. यानंतरच तुम्हाला तुमच्या स्मार्टफोनमध्ये 5G नेटवर्कचा अनुभव घेता येईल.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT