अजित पवारांसह बहिणींच्या कारखान्यांवरही आयकर विभागाची छापेमारी, राज्यात अनेक ठिकाणी धाडसत्र

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

पुणे: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवारांशी संबंधित राज्यातील अनेक साखर कारखान्यांवर आयकर विभागाने छापे मारण्यास सुरुवात केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आयकर विभागाने पाच साखर कारखान्यांवर धाडी मारण्यात आल्या आहेत. दरम्यान, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जरंडेश्वर साखर कारखान्यावर देखील छापा मारण्यात आला आहे. कालच भाजप नेते किरीट सोमय्या यांनी या साखर कारखान्याला भेट दिली होती. ज्यानंतर आता आयकर खात्याकडून ही छापेमारी करण्यात आली आहे.

ADVERTISEMENT

जरंडेश्वर साखर कारखान्यासह आंबालिका शुगर, दौंड शुगर, पुष्पदनतेश्वर शुगर या खासगी साखर कारखान्यांवर देखील आयकर विभागाने छापा मारला आहे.

त्यातील एक आहे पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील दौंड शुगर्स प्रायव्हेट लिमिटेड या खाजगी या कारखान्याचे संचालक वीरधवल जगदाळे यांना देखील आयकर विभागाने चौकशीसाठी बोलावलं आहे. वीरधवल जगदाळे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा परिषद सदस्य आणि अजित पवार यांचे निकटवर्तीय असल्याचं बोललं जात आहे. मात्र अजित पवारांचा या कारखान्याशी कोणताही थेट संबंध नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

हे वाचलं का?

दरम्यान, या सगळ्या प्रकरणी आता अजित पवारांनी देखील पुण्यात सविस्तर प्रतिक्रिया दिली आहे. पाहा यावेळी अजित पवार नेमकं काय म्हणाले.

‘आयकर विभागाने कुणावर छापा मारावा हा त्यांचा अधिकार आहे. त्यांना कोणावर शंका आल्यास ते छापेमारी करु शकतात. आज माझ्याशी संबंधित असलेल्या कंपन्यावर देखील छापेमारी करण्यात आली आहे.’

ADVERTISEMENT

‘मी नियमित टॅक्स भरतो, अर्थमंत्री असल्याने कुठलाही कर चुकवायचा नाही, टॅक्स कसा भरायचा हे सगळं मला व्यवस्थित माहित आहे. माझ्या ज्या काही कंपन्या आहेत त्या सगळ्यांचा टॅक्स वेळच्या वेळी भरला जातो. मात्र, तरी देखील ही धाड तरीही राजकीय हेतूने टाकली का हे आयकर विभागालाच माहिती असेल.’

ADVERTISEMENT

‘आयकर विभागाने माझ्याशी संबंधित कंपन्यांवर छापा मारला याबद्दलही मला काही म्हणायचं नाही. मला एका गोष्टीचं वाईट वाटलं ते म्हणजे माझ्या तीन बहिणींच्या कारखान्यांवर देखील छापे मारण्यात आले. त्यांची 35-40 वर्षापूर्वी लग्न झालेली आहेत. त्यातील एक बहीण कोल्हापूर आणि दोन पुण्यातील आहेत.’

‘त्यांच्या कारखान्यांवर देखील धाडी टाकल्या. आता यामागचं मला कारण माहिती नाही. त्या आपलं जीवन व्यवस्थित आपलं जगत आहेत. त्यांच्या मुलांची-मुलींची लग्न झालेली आहेत, नातवंडं आहेत. पण फक्त अजित पवारांचे नातेवाईक म्हणून जर आयकर विभागाने धाड टाकली असेल तर राज्यातील जनतेने याचा विचार करावा. कोणत्या स्तरावर जाऊन या संस्थांचा वापर केला जातो, हे देखील जनतेनं पाहावं.’

Devendra Fadnavis on ED: जरंडेश्वर साखर कारखाना आणि अजित पवार… पाहा फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया

‘माझ्या कंपन्यांवर धाड टाकली याचं मला काही नाही, पण नातेवाईकांवर धाड कशी? त्यांचा संबंध नसताना धाड टाकली याचं मला वाईट वाटलं. इतक्या खालच्या थराला जाऊन राजकारण मला पटलेलं नाही. सरकार येत असतं, जात असतं, पण जनता सर्वस्व आहे. जनता योग्य तो निर्णय घेत असते.’

‘मागे निवडणुकीच्या काळात, पवारसाहेबांचा एका बँकेशी काहीचा संबंध नसताना नोटीस आली, त्यावेळी राजकारण सर्वांनी पाहिलं.’ असं म्हणत अजित पवार यांनी ही छापेमारी राजकीय आकसातून झाली असल्याचं म्हटलं आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT