अजित पवारांनी बोलता बोलता जयंत पाटलांनाही सुनावले खडेबोल? ‘त्या’ भाषणाची का होतेय चर्चा?

मुंबई तक

‘तुम्ही इतकं सुंदर भाषण… सगळ्यांना मार्गदर्शन करता. परंतु तुमच्या स्वतःच्या जिल्ह्यातून तुमच्याशिवाय कुणी निवडूनच येत नाही’, हे विधान आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार यांचं. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा सोमवारी १२ डिसेंबरला ८३ वाढदिवस साजरा करण्यात आला. मुंबईत हा अभिष्टचिंतन सोहळा झाला. याचवेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेतेमंडळींनी मार्गदर्शन केलं. […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

‘तुम्ही इतकं सुंदर भाषण… सगळ्यांना मार्गदर्शन करता. परंतु तुमच्या स्वतःच्या जिल्ह्यातून तुमच्याशिवाय कुणी निवडूनच येत नाही’, हे विधान आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार यांचं. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा सोमवारी १२ डिसेंबरला ८३ वाढदिवस साजरा करण्यात आला. मुंबईत हा अभिष्टचिंतन सोहळा झाला. याचवेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेतेमंडळींनी मार्गदर्शन केलं. आणि हाच धागा पकडत अजित पवारांनी आपल्याच पक्षातल्या नेतेमंडळींना खडेबोल सुनावले.

अजित पवारांनी राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांना मंचावरच खडेबोल सुनावले. तर काहींचं कौतुकही केलं. पण याच कौतुकावरून आता राजकीय ठिणगी पडण्याची शक्यता वर्तवली जातेय. बोलता बोलता अजित पवारांनी थेट प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनाही ताकदीचा आरसा दाखवल्याचं म्हटलं जातंय. अजित पवार कुठे आणि काय म्हणाले, त्याचा राजकीय अर्थ काय हेच आपण बघणार आहोत.

अजित पवारांनी शरद पवारांसमोरच पिळले नेत्यांचे कान; म्हणाले, ‘कुणाची बिनपाण्याने करायची…’

अजित पवार नेमकं काय म्हणाले ते बघा…

मुंबईत झालेल्या कार्यक्रमात अजित पवार म्हणाले, “मी बोललोय… याला अपवाद फक्त नाशिक आणि बीड जिल्हा आहे आणि दिलीपराव पुणे जिल्ह्याचे असल्यामुळे पुणे जिल्हा आहे. तुम्ही इतकं सुंदर भाषण… सगळ्यांना मार्गदर्शन करता. परंतु तुमच्या स्वतःच्या जिल्ह्यातून तुमच्याशिवाय कुणी निवडूनच येत नाही. मी आज साहेबांच्या वाढदिवसानिमित्ताने कुणाची बिनपाण्याने करायची असं ठरवलं नव्हतं, पण खरं ते बोललं पाहिजे,” अशा शब्दात अजित पवारांनी सुनावलं.

हे वाचलं का?

    follow whatsapp