‘तशीच भूमिका घ्या’; बसवराज बोम्मईंच्या विधानानंतर अजित पवार भडकले

मुंबई तक

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर महाराष्ट्र कर्नाटक सीमाभागातील तणाव काही प्रमाणात निवळला. मात्र, कर्नाटकाचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी पुन्हा यासंदर्भात विधान केल्यानं वाद वाढला आहे. विरोधी पक्षनेते अजित पवारांनी बसवराज बोम्मईंच्या विधानावर संताप व्यक्त केलाय. कर्नाटक विधिमंडळात महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादासंदर्भात ठराव मंजूर करण्यासाठी सत्ताधारी विरोधक एकत्र आले आहेत. त्यावर बोलताना अजित पवार म्हणाले, ‘सीमावादासंदर्भात […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर महाराष्ट्र कर्नाटक सीमाभागातील तणाव काही प्रमाणात निवळला. मात्र, कर्नाटकाचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी पुन्हा यासंदर्भात विधान केल्यानं वाद वाढला आहे. विरोधी पक्षनेते अजित पवारांनी बसवराज बोम्मईंच्या विधानावर संताप व्यक्त केलाय.

कर्नाटक विधिमंडळात महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादासंदर्भात ठराव मंजूर करण्यासाठी सत्ताधारी विरोधक एकत्र आले आहेत. त्यावर बोलताना अजित पवार म्हणाले, ‘सीमावादासंदर्भात ठराव मंजूर करण्यासाठी विरोधी पक्ष पाठिंबाच देईल. आपल्याकडेही तो ठराव केला जाणार आहे. वास्तविक बोम्मई त्यांच्या भागातील नागरिकांना कर्नाटकवासियांना बरं वाटावं म्हणून अशा पद्धतीची विधानं करताहेत.’

‘महाराष्ट्राला एक इंचही जमीन देणार नाही’, बोम्मईंनी पुन्हा डिवचलं, वाद चिघळणार!

‘माझा मुद्दा हाच आहे की, आपल्याही मुख्यमंत्र्यांनी (एकनाथ शिंदे), उपमुख्यमंत्र्यांनी (देवेंद्र फडणवीस) तशाच पद्धतीची आक्रमक विधानं करायला पाहिजे. महाराष्ट्रातील सीमावासियांना समाधान वाटेल. जशास तसं उत्तर दिलं पाहिजे. मी सातत्यानं बोलतोय. आजही माझी भूमिका तीच आहे. आज मी पुन्हा सभागृहात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना विचारेनं की ठराव कोणत्या तारखेला घ्यायचा आहे,’ असं अजित पवारांनी म्हटलं आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp