Sharad Pawar Speech : देशातील हिंसा, प्रोपागंडा आणि माध्यमे; शरद पवार यांचं संपूर्ण भाषण
९५व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे उद्घाटन शरद पवार यांच्या हस्ते झालं. यावेळी शरद पवार यांनी भूमिका मांडली. शरद पवार यांनी समाज जीवनातील साहित्याचं महत्त्व, चौथा स्तंभ आणि सध्या देशात निर्माण झालेल्या स्थितीबद्दल भाष्य केलं. शरद पवार यांचं भाषण जसंच्या तसं… आपल्या स्वर्गीय आवाजाने संपुर्ण जगाला मंत्रमुग्ध करणाऱ्या , संगीत विश्वात अजरामर झालेल्या स्वरसम्राज्ञी लतादिदींचे नाव […]
ADVERTISEMENT

९५व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे उद्घाटन शरद पवार यांच्या हस्ते झालं. यावेळी शरद पवार यांनी भूमिका मांडली. शरद पवार यांनी समाज जीवनातील साहित्याचं महत्त्व, चौथा स्तंभ आणि सध्या देशात निर्माण झालेल्या स्थितीबद्दल भाष्य केलं.
शरद पवार यांचं भाषण जसंच्या तसं…
आपल्या स्वर्गीय आवाजाने संपुर्ण जगाला मंत्रमुग्ध करणाऱ्या , संगीत विश्वात अजरामर झालेल्या स्वरसम्राज्ञी लतादिदींचे नाव संमेलन नगरीस दिले याबद्दल मी संयोजकांचे आभार मानतो. लतादिदींनी आपल्या अमृतमय कंठाद्वारे साहित्यातील गीत आणि काव्य प्रकाराला साज चढवला आणि कोट्यवधी रसिकांना मोहिनी घातली.
साहित्यविश्वाने ह्याच ऋणानुबंधातून लतादिदींना दिलेली ही एक सार्थ आदरांजली आहे असे मी मानतो. मंगेशकर कुटूंबियाने हजारो गीते लिहिण्यासाठी कवी, गीतकारांना प्रेरीत केलं , ही गीते देखील साहित्याचा गुणगुणता येणारा अनमोल ठेवा आहे. ह्या उद्घाटनप्रसंगी मी लता दिदींना श्रद्धांजली अर्पित करतो. त्याचबरोबर मागील वर्षी प्रसिद्ध लेखक द.मा. मिरासदार व कवी सतीश कळसेकर , मराठवाड्यातील साहित्यिक तु.शं. कुळकर्णी यांचेही निधन झाले. त्यांना सुद्धा ह्या साहित्यपीठावरून मी श्रद्धांजली अर्पण करतो.