Allu Arjun Stampede Case : अल्लू अर्जून पुन्हा पोलीस स्टेशनमध्ये, आज चौकशी होणार? हैदराबादमध्ये नेमकं काय घडतंय?
Allu Arjun Controversy: अल्लू अर्जुनच्या घराबाहेर मोठ्या प्रमाणात सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात आले होते. यावेळी पोलिसांच्या हातात लाठ्या दिसल्या.
ADVERTISEMENT

▌
बातम्या हायलाइट
अल्लू अर्जून पुन्हा पोलीस ठाण्यात दाखल
संध्या थिअटर चेंगराचेंगरी प्रकरणात
हैदराबाद संध्या थिएटरबाहेर झालेल्या चेंगराचेंगरी प्रकरणी अभिनेता अल्लू अर्जुन पोलिस स्टेशनमध्ये दाखल झाला आहे. पोलीस चौकशी आज अल्लू अर्जूनची चौकशी करणार आहेत. आपल्या वकिलांसोबत अल्लू अर्जून चिक्कडपल्ली पोलीस ठाण्यात दाखल झाला आहे.
हे ही वाचा >>Suresh Dhas : "मुख्यमंत्री किंवा दोन्ही उपमुख्यमंत्र्यांपैकी कुणीही बीडचं पालकमंत्रिपद...."; सुरेश धस यांचा मुंडेंना थेट विरोध?
अल्लू अर्जुनच्या घराबाहेर मोठ्या प्रमाणात सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात आले होते. यावेळी पोलिसांच्या हातात लाठ्या दिसल्या. 4 डिसेंबर रोजी हैदराबादमधील संध्या थिएटरमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीत एका महिलेचा मृत्यू झाला होता, तर तिचा आठ वर्षांचा मुलगा जखमी झाला होता.
अल्लू अर्जुन चौकशीसाठी चिक्कडपल्ली पोलिस ठाण्यात पोहोचला आहे. चेंगराचेंगरीप्रकरणी एसीपी रमेश कुमार आणि डीसीपी सेंट्रल झोन अल्लू अर्जुनची चौकशी करणार आहेत.










