‘तुला आज ठोकून टाकतो’, माजी नगरसेवक कुणाल पाटील, पंढरीनाथ फडकेंसह 32 जणांवर मोक्का

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

बैलगाडा शर्यतीच्या मुद्द्यावरून अंबरनाथमध्ये दोन गटात वाद झाले. वाद विकोपाला गेल्यानंतर थेट गोळीबार करण्यात आला. या प्रकरणात पोलिसांनी पंढरीनाथ फडके यांच्यासह काही आरोपींना अटक केलेली आहे. इतरांचा शोध सुरू असतानाच पोलिसांनी गोळीबार प्रकरणातील 32 आरोपींविरुद्ध मोक्का (महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायदा 1999) लावण्यात आलाय. यात कल्याण-डोंबिवली महापालिकेतील माजी नगरसेवक कुणाल पाटील, पंढरीनाथ फडके यांचाही समावेश आहे.

ADVERTISEMENT

13 नोव्हेंबर रोजी दुपारी 3.30 वाजता बोहनोली गावात होणाऱ्या बैलगाडा शर्यतीच्या चर्चेसाठी राहुल पाटील (रा.अडिवली, कल्याण) हे त्यांच्या सहकाऱ्यांसह खासगी वाहनातून जात होते.

त्यावेळी सुदामा हॉटेल व अंबरनाथ एमआयडीसी कार्यालयासमोर रोडच्या कट्ट्यावर आरोपी गुरूनाथ पंढरीनाथ फडके, पंढरीनाथ जगन फडके, मंगेश पंढरीनाथ फडके, मिलन अण्णा पालकर, राजेश कातारा, संदेश उर्फ पप्या फडके, केतन देशमुख, समीर कुटले, दर्शन पाटील, प्रशांत फडके यांच्यासह इतर आरोपींनी त्यांची वाहनं अडवली.

हे वाचलं का?

मंगेश फडके, गुरूनाथ फडकेंनी पिस्तूल रोखत दिली धमकी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार राहुल पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांची वाहनं अडवल्यानंतर मंगेश पंढरीनाथ फडके, गुरूनाथ पंढरीनाथ फडके यांनी राहुल पाटील यांना धमकी दिली. ‘तू कुणाल पाटील यांच्या विरोधात निवडणुकीला कसा उभा राहतो? तुला आज ठोकून टाकतो. येथे कुणाल पाटील, अनिल पाटील व मयूर पाटील हे सुद्धा येणार आहेत”, असं आरोपी म्हणाले.

“तुला जिवे ठार मारून, आज तुझं मयत इथेच टाकणार, मग तू निवडणुकीला कसा निवडून येशील?”, असं म्हणत आरोपींनी राहुल पाटील आणि त्यांच्या साथीदारांच्या दिशेने पिस्तूल, रिवॉल्व्हर, डबल बोअर बंदूकीतून गोळीबार केला.

ADVERTISEMENT

या प्रकरणी गुरूनाथ पंढरीनाथ फडके, पंढरीनाथ जगन फडके आणि त्यांच्या साथीदारांविरुद्ध शिवाजी नगर पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

ADVERTISEMENT

दरम्यान, टोळीप्रमुख गुरूनाथ पंढरीनाथ फडके आणि त्याचे साथीदार राजकीय व गुन्हेगारी वर्चस्व निर्माण करण्याकरिता शस्त्रासह बेकायदेशीर कृत्य करून संघटीत हिंसाचाराचा अवलंब करत आहेत. आरोपींनी नवी मुंबई, रायगड, ठाणे परिसरात जिवे मारण्याचा प्रयत्न करणं, धमकावणं, मारहाण करणं आदी गंभीर गुन्हे केलेले आहेत.

गुरुनाथ फडके आणि त्याच्या टोळीविरुद्ध कारवाई करूनही त्यांच्याकडून सातत्यानं गुन्हे होत असल्यानं पोलिसांनी मोक्का कलमान्वये दाखल करण्याचा प्रस्ताव पोलिसांनी वरिष्ठांना पाठवला होता. कल्याण पूर्वचे अतिरिक्त पोलीस आयुक्त दत्तात्रय शिंदेंनी कुणाल पाटील, पंढरीनाथ फडके यांच्यासह 32 आरोपींविरुद्ध मोक्का अंतर्गत कारवाई करण्याची परवानगी दिली आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT