एक Facebook Post आणि सोशल मीडियावर व्हायरल झाला अंबरनाथचा ‘सिलिंडर मॅन’

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

विक्रांत चव्हाण, प्रतिनिधी, ठाणे

अंबरनाथमधील एक सिलिंडरमॅन सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतो आहे. त्याचं नाव आहे सागर जाधव. अंबरनाथमधला एक पिळदार शरीरयष्टी असलेल्या सिलिंडर मॅनचे फोटो गेल्या दोन दिवसांपासून सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. सिलिंडर डिलिव्हरी करणारा सागर सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. अंबरनाथच्या भारत गॅसची कंपनीत डिलिव्हरी बॉय म्हणून काम करणारा सागर जाधव हा राणू गॅस एजन्सीमध्ये काम करतो.

दोन दिवसांपूर्वी सागर जाधव अंबरनाथ स्टेशन भागात असलेल्या सिलिंडरच्या गाडीजवळ उभा असताना असताना तुषार भामरे या तरूणाचे त्याचे व्यक्तीमत्व पाहून त्याचे फोटो काढले. सागरच्या नकळत त्याने ते फेसबुकवर पोस्ट केले. एखाद्या वेब सीरिजमधलं पात्र शोधावं असा सिलिंडर मॅन अशा ओळी लिहून तुषार भामरे या तरूणाने फेसबुकवर पोस्ट केले. हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहेत. वेब सीरिज कास्टिंग डायरेक्टरपासून ते निर्मात्यांपर्यंत सगळ्यांनीच कौतुक केलं आणि सागर सोशल मीडियावर हिट झाला.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

कोण आहे सागर जाधव?

सागर जाधव हा मूळचा नाशिक जिल्ह्यातला आहे. 12 वीपर्यंत सागरने शिक्षण घेतलं आहे. सागरचं बालपण नाशिक जिल्ह्यात गेलं आणि शिक्षणही तिथेच झालं. आई-वडिलांचं छत्र हरपलेल्या सागरने बारावीनंतर अंबरनाथला काका-काकूंकडे येऊन नोकरी शोधण्यास सुरूवात केली. सध्या तो राहात असलेल्या लक्ष्मीनगर परिसरात भारत गॅसचं गोडाऊन आहे. गेल्या बारा वर्षांपासून सागर नोकरी करतो आहे.

ADVERTISEMENT

आधी अतिशय सडपातळ असलेल्या सागरला आपण 30 किलोचा सिलिंडर उचलायचा तर आपण 45 किलोंचं असून कसं चालेल? असा प्रश्न पडला. त्याने मागच्या तीन वर्षांपासून शरीरयष्टी कमवण्यास सुरूवात केली. यानंतर त्याला आता पाहिलं की जो आधी सडपातळ होता तो सागर हाच आहे का? यावर विश्वास बसत नाही. सागरच्या घरी काका-काकू आणि पत्नी असं कुटुंब आहे. अतिशय मेहनत करून 4-4 मजले सिलिंडर खांद्यावर घेऊन पायऱ्या चढून ते लोकांपर्यंत पोहचवून सागर त्याचं घर चालवतो.

ADVERTISEMENT

आपल्याला सोशल मीडियावर इतकी प्रसिद्धी मिळेल आणि आपण व्हायरल होऊ असं सागरला वाटलंही नव्हतं. एखाद्या जाहिरातीची किंवा वेब सीरिजची ऑफर आली तर आपल्याला करायला नक्की आवडेल असं सागर सांगतो. सिलिंडर मॅन ही आपल्याला मिळालेली ओळख असल्याचंही त्याने मान्य केलं आहे. अंबरनाथकरांनाही या सिलिंडर मॅनचं कौतुक वाटतं आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT