Amit Shah: मुख्यमंत्री पदासाठी ठाकरेंनी काँग्रेस-NCPचे तळवे चाटले: शाह

मुंबई तक

Amit Shah venomous criticism: पुणे: शिवसेना (Shiv Sena) पक्ष आण चिन्ह या दोन्ही गोष्टी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या (CM Eknath Shinde) गटाला मिळालाल्यानंतर भाजप (BJP) नेते हे उद्धव ठाकरेंविरोधात (Uddhav Thackeray) चांगलेच आक्रमक झाले आहेत. मोदी@20 (Modi @20) या पुस्तक प्रकाशनाच्या पुण्यातील (Pune) जाहीर कार्यक्रमात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shaa) यांनीही उद्धव ठाकरेंवर अत्यंत जहरी […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

Amit Shah venomous criticism: पुणे: शिवसेना (Shiv Sena) पक्ष आण चिन्ह या दोन्ही गोष्टी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या (CM Eknath Shinde) गटाला मिळालाल्यानंतर भाजप (BJP) नेते हे उद्धव ठाकरेंविरोधात (Uddhav Thackeray) चांगलेच आक्रमक झाले आहेत. मोदी@20 (Modi @20) या पुस्तक प्रकाशनाच्या पुण्यातील (Pune) जाहीर कार्यक्रमात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shaa) यांनीही उद्धव ठाकरेंवर अत्यंत जहरी शब्दात टीका केली आहे. ‘मुख्यमंत्री पदासाठी उद्धव ठाकरेंनी राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) आणि काँग्रेसचे (Congress) तळवे चाटले.’ अशा शब्दात अमित शाह यांनी उद्धव ठाकरेंवर तोफ डागली. (uddhav thackeray licked the palms of congress ncp for post of chief minister amit shahs venomous criticism)

पाहा पुण्याच्या कार्यक्रमात अमित शाह नेमकं काय म्हणाले:

  • उद्धव ठाकरेंनी NCP-काँग्रेसचे तळवे चाटले: अमित शाह

‘कालच एक मोठा विजय आमच्या युतीला मिळाला आहे. शिंदेंच्या शिवसेनेला खरी शिवसेना आणि धनुष्यबाण या दोन्ही गोष्टी मिळाल्या आहेत. एकदा टाळ्या वाजवून त्यांचं अभिनंदन करा. जी लोकं खोटेपणाच्या आधारावर हुंकार भरत होते त्यांना आज माहित पडलं की, सत्य कोणासोबत आहे.’

2019 च्या निवडणुकीत मी पक्षाचा अध्यक्ष होतो. निवडणूक आम्ही युतीत लढलो. स्वत:च्या फोटोपेक्षा मोदींचा मोठा फोटो लावला. देवेंद्रजींना नेता मानून निवडणूक लढली आणि नंतर मुख्यमंत्री बनणण्यासाठी विरोधी विचारधारा असलेल्यांचे तळवे चाटू लागले. आज त्यांनाच सत्य काय आहे ते कळलं आहे. अशी जहरी टीका अमित शाह यांनी केली आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp