वसुली सुरु आहे की बंद? Maharashtra Bandh वरुन अमृता फडणवीसांचा राज्य सरकारला टोला
लखीमपूरमधील दुर्घटनेच्या निशेधार्थ महाविकास आघाडीतल्या पक्षांनी आज महाराष्ट्र बंदची घोषणा केली होती. या बंदला राज्यभरात काही तुरळक घटनांचा अपवाद वगळता संमिश्र प्रतिसाद पहायला मिळाला. एकीकडे सत्ताधाऱ्यांनी हा बंद यशस्वी झाला असल्याचं सांगितलं असलं तरीही विरोधकांनी मात्र आजच्या बंदवरुन सरकारला धारेवर धरलं आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनीही सरकारवर निशाणा साधला आहे. […]
ADVERTISEMENT
लखीमपूरमधील दुर्घटनेच्या निशेधार्थ महाविकास आघाडीतल्या पक्षांनी आज महाराष्ट्र बंदची घोषणा केली होती. या बंदला राज्यभरात काही तुरळक घटनांचा अपवाद वगळता संमिश्र प्रतिसाद पहायला मिळाला. एकीकडे सत्ताधाऱ्यांनी हा बंद यशस्वी झाला असल्याचं सांगितलं असलं तरीही विरोधकांनी मात्र आजच्या बंदवरुन सरकारला धारेवर धरलं आहे.
ADVERTISEMENT
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनीही सरकारवर निशाणा साधला आहे.
Maharashtra Bandh: शरद पवारांच्या आग्रहामुळे शिवसेनेची फरफट, आजचा बंद फसला – चंद्रकांत पाटील
हे वाचलं का?
मला कोणी सांगेल का की आज वसुली सुरु आहे की बंद? असं ट्विट करत अमृता फडणवीसांनी सरकारला टोला लगावला आहे.
Can anyone update me –
आज वसूली चालू है या बंद ?#MaharashtraBandhNahiHai— AMRUTA FADNAVIS (@fadnavis_amruta) October 11, 2021
राज्यात भाजपचं सरकार गेल्यानंतर अमृता फडणवीस या ट्विटरवरुन शिवसेना आणि महाविकास आघाडी सरकारवर नेहमी टीका करत असतात. सचिन वाझे-अनिल देशमुख प्रकरणांनंतर विरोधकांकडून महाविकास आघाडी सरकारचा उल्लेघ महावसुली आघाडी सरकार असा केला जातो. हाच धागा पकडत अमृता फडणवीसांनी सरकारवर टीका केली आहे.
ADVERTISEMENT
दरम्यान अमृता फडणवीसांनी केलेल्या टीकेला राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी उत्तर दिलं आहे.
ADVERTISEMENT
वहिनींच्या गाण्यात सुरांचा जसा ताळमेळ नसतो तसं त्यांच्या बोलण्यात सुद्धा आजकाल काही ताळमेळ नसतो??
संवेदनाहिन मनाचं आणि अर्धवट ज्ञानाचं परफेक्ट कॉम्बिनेशन म्हणजे अमृता वहिनी. https://t.co/SdHZLYxPmp
— Rupali Chakankar (@ChakankarSpeaks) October 11, 2021
महाविकास आघाडी सरकारमधील काँग्रेसनेही आजच्या बंदच्या निमीत्ताने भाजपवर टीका केली आहे. एकीकडे शेतकऱ्यांच्या विरोधातले कायदे करायचे आणि नंतर मग शेतकऱ्यांना दहशतवादी ठरवायचं त्यांना ढोंगी म्हणायचं हेच भाजपचं धोरण आहे असं वक्तव्य काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटलं आहे.
Maharashtra Bandh : ‘शिवभोजन थाळी’ देणाऱ्या हॉटेलचीच शिवसैनिकांकडून तोडफोड, चंद्रपुरातली घटना
भाजपचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले नव्हते. आज रस्त्यावर लोक आंदोलनाला प्रतिसाद देत होते. शेतकऱ्यांचे मारेकरी जे आहेत त्यांना आजचं आंदोलन हे ढोंगीपणाच वाटणार. शेतकरी विरोधी धोरण राबवायचं आहे जो शेतकरी हिताचं धोरण राबवेल तो भाजपसाठी ढोंगी आणि दहशतवादी असतो असंही नाना पटोले यांनी म्हटलं आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT