आजारावर मात करत कल्याणच्या अनंत जोशींनी जपला इतिहासाचा ठेवा
कल्याणचे अनंत जोशी यांनी त्यांच्या आजारावर मात करत तब्बल चार हजार शिरस्त्राणांचा ठेवा जपला आहे विभिन्न प्रांत, जाती, जमातींच्या विविधतेने नटलेल्या आपल्या भारतात प्राचीन काळापासून म्हणजे मोहेंजोदडो-हडप्पा संस्कृतीच्या काळापासून टोप्या किंवा पगडी वापरली जात असल्याचे दाखले सापडतात. तर साधारणपणे साडेतीन हजारांहून अधिक असे समाज, जाती, जमाती आहेत ज्या डोक्यावर टोपी, पगडी, रुमाल आदीसारख्या वस्तू वापरत […]
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
कल्याणचे अनंत जोशी यांनी त्यांच्या आजारावर मात करत तब्बल चार हजार शिरस्त्राणांचा ठेवा जपला आहे
हे वाचलं का?
विभिन्न प्रांत, जाती, जमातींच्या विविधतेने नटलेल्या आपल्या भारतात प्राचीन काळापासून म्हणजे मोहेंजोदडो-हडप्पा संस्कृतीच्या काळापासून टोप्या किंवा पगडी वापरली जात असल्याचे दाखले सापडतात. तर साधारणपणे साडेतीन हजारांहून अधिक असे समाज, जाती, जमाती आहेत ज्या डोक्यावर टोपी, पगडी, रुमाल आदीसारख्या वस्तू वापरत असल्याचे अनंत जोशी यांनी बोलताना सांगितले.
ADVERTISEMENT
अनंत जोशी हे गेल्या 30 वर्षांपासून हा आपला अनोखा छंद जोपासत असून शिरोभूषण नावाच्या संग्रहालयात हा ठेवा जोपासला आहे.
ADVERTISEMENT
भारताचा विचार केल्यास इकडे सत्ता गाजवलेल्या मराठा, राजपूत, मुघल काळातील युद्धकालीन शिरस्त्राण, जिरेटोप आदींचां खजिना आहे. तर जगभरातील ब्रिटन, जर्मनी, इटली, ऑस्ट्रेलिया, चीन, रशिया आदी देशांतील विविध टोप्या, पगड्या, युद्धकालीन जिरेटोप, शिरस्त्राण संग्रही आहेत
यातील सर्वात जुने म्हणजे 18 व्या शतकात अफाणिस्तानमध्ये धातूंपासून बनवलेले शिरस्त्राणही आपल्या संग्रही असल्याचे जोशी यांनी सांगितले.
8 वर्षांचे असताना अनंत जोशी यांना एक वेगळ्या प्रकारची काविळ झाली. ज्यामुळे आपण बिछान्यावर झोपूनच होतो. त्यावेळी टिव्ही हाच एकमेव आपल्याला आधार घेऊन. टिव्हीवर त्याकाळी येणाऱ्या रामायण आणि महाभारत या मालिका पाहूनच आपल्याला हा छंद जडला.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT