Andheri East by poll : काँग्रेसच्या भूमिकेमुळे शिवसेनेला बळ! नाना पटोलेंनी मांडली भूमिका

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

Andheri East Assembly by poll 2022 : रमेश लटके यांच्या अकाली निधनाने रिक्त झालेल्या अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक होत आहे. शिवसेनेतल्या फुटीनंतरची ही पहिलीच महत्त्वाची निवडणूक असून, या निवडणुकीत महाविकास आघाडी (शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस) विरुद्ध भाजप आणि शिंदे गट अशी थेट लढत बघायला मिळणार, हे आता स्पष्ट झालंय.

राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेससोबत न राहता भाजपसोबत चला, अशी मागणी करत एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या आमदारांनी बंडखोरी केली. त्यापाठोपाठ बहुसंख्य खासदारही शिंदे गटात गेले. त्यानंतर आता आम्हीच खरी शिवसेना असल्याचा दावा शिंदे गटाकडून केला जात असून, शिवसेनेतल्या फुटीनंतर पहिली निवडणूक महत्त्वाची निवडणूक होत आहे.

काँग्रेसने शिवसेना उमेदवाराला का दिला पाठिंबा?

रमेश लटके यांचं निधन झाल्यानंतर उद्धव ठाकरेंनी त्यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांना अंधरी पूर्व विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दिलीये. शिवसेनेनं उमेदवारी जाहीर केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस काय भूमिका घेणार हे महत्त्वाचं होतं.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

२०१९ मध्ये शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांनी एकत्र येत महाविकास आघाडी स्थापन केली आणि सरकारही स्थापन केलं. मात्र, सत्ता स्थापनेसाठी स्थापन करण्यात आलेली महाविकास आघाडी सत्ता गेल्यानंतर कायम राहणार का? याकडे सगळ्यांचं लक्ष होतं. सत्ता गेल्यानंतरही शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र निवडणुकीला सामोरं जाणार आहेत.

Andheri East by election : मराठी मतं ते मविआ, 3 फॅक्टर जे उद्धव ठाकरेंचं भविष्य ठरवणार!

ADVERTISEMENT

काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शिवसेना उमेदवार ऋतुजा लटके यांना पाठिंबा जाहीर केला. काँग्रेसनं भूमिका जाहीर केलेली नव्हती. अखेर काँग्रेसची भूमिका समोर आलीये. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी शिवसेना उमेदवारला पाठिंबा जाहीर केलाय. अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणूक काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस हे तिन्ही पक्ष महाविकास आघाडी म्हणून लढतील, असं नाना पटोले यांनी स्पष्ट केलं.

ADVERTISEMENT

अंधेरी पूर्व विधानसभा निवडणूक : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी काय मांडली भूमिका?

अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीबद्दल काँग्रेस उमेदवार उतरवणार का? या प्रश्नावर नाना पटोले म्हणाले, ‘विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर जातीयवादी धर्मांध भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी आणि महाराष्ट्राच्या हितासाठी महाराष्ट्र विकास आघाडी स्थापन झाली होती. राज्यात अडीच वर्षे या महाविकास आघाडीचे सरकार होतं. या सरकारने शेतकरी कर्जमाफीसारखे अनेक जनहिताचे निर्णय घेतले.”

Andheri east by poll : अंधेरी पूर्वची जागा एकनाथ शिंदेंनी भाजपला का सोडली? ही आहेत 3 कारणं

“कोरोनासारख्या संकटात महाविकास आघाडी सरकारने देशात सर्वोत्तम काम केलं, पण सत्तापिपासू भाजपने ईडी सीबीआय या केंद्रीय संस्थाचा दुरुपयोग करून शिवसेनेच्या आमदारांना फोडून महाविकास आघाडी सरकार पाडलं. महाविकास आघाडी फोडण्याचे प्रयत्न भाजपने केले ते यशस्वी झाले नाहीत म्हणून त्यांनी शिवसेना पक्ष फोडला”, असं नाना पटोले म्हणाले.

“भाजपविरोधातल्या या लढाईत महाविकास आघाडी म्हणून काँग्रेस पक्ष शिवसेनेसोबत खंबीरपणे उभा आहे. त्यामुळे अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत काँग्रेस पक्ष आपला उमेदवार देणार नाही. शिवसेना पक्ष जो उमेदवार देईल त्याला निवडून आणण्यासाठी काँग्रेस पक्षाचे नेते आणि कार्यकर्ते पूर्ण ताकदीने काम करतील”, अशी भूमिका नाना पटोले यांनी मांडली.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT