अंधेरी पूर्व पोटनिवडणूक : भाजपच्या मुरजी पटेलांनी उमेदवारी अर्ज भरण्याची तयारी केली, पण…

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

Andheri east bypoll 2022 : ‘शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे’कडून रमेश लटकेंच्या पत्नी ऋतुजा लटकेंना उमेदवारी देण्याची घोषणा करण्यात आलीये. त्यामुळे शिंदे गटाची कोंडी झाली असून, आता मुरजी पटेलांचा उमेदवारी अर्ज भरण्याचा मुहूर्त आणखी एक दिवस लांबणीवर गेलाय. त्यामुळे भाजप-शिंदे गटातल्या हालचालींकडे सगळ्यांच्या नजरा लागल्यात.

अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीच्या निमित्ताने उद्धव ठाकरेंसमोर पेच उभा ठाकला असताना भाजप-शिंदे गटातल्या हालचालींकडे सगळ्यांची नजर लागलीये. अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीत रमेश लटकेंच्या पत्नी ऋतुजा लटकेंना उमेदवारी देण्याची तयारी उद्धव ठाकरेंनी केली.

मात्र, ऋतुजा लटकेंच्या नोकरीच्या राजीनाम्यामुळे त्यांच्या उमेदवारीबद्दल अनिश्चितता निर्माण झालीये. तर दुसरीकडे ‘भाजप-बाळासाहेबांची शिवसेना’ युतीतही पडद्यामागे घडामोडी घडताहेत. भाजपनं अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत उमेदवाराची अधिकृत घोषणा केलेली नाही. मात्र, अंधेरी पूर्वची जागा भाजप लढवणार हे स्पष्ट आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

अंधेरी पूर्व मधून भाजपचे मुरजी पटेल निवडणूक लढवणार असून, ते आज उमेदवारी अर्ज दाखल करणार होते. मात्र, अचानक उमेदवारी अर्ज भरणं आज टाळण्यात आलं आहे. मुरजी पटेल उद्या अर्ज दाखल करणार असल्याचं सांगण्यात आलंय. उमेदवारी अर्ज भरण्याचा उद्या अखेरचा दिवस आहे. त्यामुळे भाजप-शिंदे अखेरच्या धक्का देऊ शकतं, अशी चर्चा आता सुरू झालीये.

मुरजी पटेलांच्या नावाची अधिकृत घोषणा नाही, भाजपची भूमिका बदलणार?

महाराष्ट्रातल्या अंधेरी पूर्व मतदारसंघासह बिहार, हरयाणा, तेलंगणा, उत्तर प्रदेश आणि ओडिशामध्येही पोटनिवडणूक होत आहे. भाजपकडून अंधेरी पूर्व वगळता इतर मतदारसंघातल्या पोटनिवडणुकीसाठी अधिकृतपणे उमेदवारांची घोषणा करण्यात आलीये. मात्र, मुरजी पटेलांचं नाव पक्षाकडून अधिकृतपणे जाहीर करण्यात आलेलं नाही. त्यात मुरजी पटेल यांचा उमेदवारी अर्ज दाखल करणंही उद्यावर (१४ ऑक्टोबर) ढकलण्यात आलंय. त्यामुळे भाजप ऐनवेळी कोणती खेळी करणार याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरूये.

ADVERTISEMENT

ऋतुजा लटकेंना उमेदवारी देण्याचे शिंदे गटाचे प्रयत्न?

रमेश लटके हे शिवसेनेचे आमदार होते. त्यांच्या पत्नींना ठाकरेंकडून उमेदवारी देण्यात आलीये. त्यामुळे शिवसैनिकाच्याविरुद्ध शिंदे गट भाजपची साथ देत असल्याचं ठाकरे गटाकडून म्हटलं जातंय. शिंदेंची यावरून निवडणुकीत कोंडी होऊ शकते. दरम्यान, ऋतुजा लटके यांना शिंदे गटाकडून उमेदवारी देण्याचे प्रयत्न सुरू असल्याचं बोललं जात आहे. अनिल परब यांनी थेट शिंदे गटावर याबद्दल आरोप केलाय. अंधेरी पूर्वच्या निवडणुकीबद्दल शिंदे गटाची अद्याप भूमिका समोर आलेली नाही. त्यामुळे शिंदे गटाची भूमिका आज, उद्या समोर येऊ शकते.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT