अनिल देशमुख वाद: सुप्रिया सुळे म्हणतात…, महाराष्ट्राचं नाव बदनाम होतंय

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मुंबई: गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर आयपीएस अधिकारी परमबीर सिंग यांनी केलेल्या आरोपात एका मीडिया हाऊसला दिलेल्या मुलाखतीत सुप्रिया सुळे असं म्हणाल्या की, ‘अशा स्वरुपांच्या आरोपांमुळे महाराष्ट्राचं नाव बदनाम होतंय. जेव्हा-जेव्हा यासारख्या गोष्टी घडतात तेव्हा-तेव्हा आम्ही दुखावलं जातो. त्यावेळी सत्तेत कोण आहे, कोण आरोप करतोय हे महत्त्वाचं नाही. पण त्यामुळे राज्याचं नाव खराब होतं त्याविषयी वाईट वाटतं.’

ADVERTISEMENT

दरम्यान, या मुलाखतीत सुप्रिया सुळे यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांची पाठराखणच केल्याचं दिसून येतंय. परमबीर सिंग यांनी केलेल्या आरोपात काहीही तथ्य नाही. कोरोना काळ असल्याने अनेक महिने हॉटेल आणि बार सुरु नव्हते. त्यामुळे गृहमंत्र्यांवर जे आरोप केले जात आहेत त्यांना काहीही अर्थ नसल्याचं सुप्रिया सुळेंनी म्हटलं आहे.

मिठाचा खडा टाकण्याचं काम करु नका ! अजित पवारांचा संजय राऊतांना टोला

हे वाचलं का?

पाहा नेमकं काय म्हणाल्या आहेत सुप्रिया सुळे:

‘आरोपांबाबत आपण गंभीर असलं पाहिजे’

‘विरोधकांच्या कोणत्याही मागण्या आपण गंभीरपणेच घेतल्या पाहिजेत. कारण आमचं काम हे अत्यंत जबाबदारीचं आहे. आरोप हे गंभीरच आहेत. मोठे आकडे असणारे आरोप हे नक्कीच गंभीर आहेत. पण याचा अर्थ असा नाही की ते अगदीच खरे आहेत. त्यामुळे सत्य आणि आरोप काय हे आपण समजून घेतलं पाहिजं. पण आपल्या विरोधात होणाऱ्या आरोपांबाबत आपण गंभीर असलं पाहिजे असं माझं मत आहे.’ असं सुप्रिया सुळे म्हणाल्या

ADVERTISEMENT

‘अनिल देशमुखांना अपघातानं मिळालं गृहमंत्रीपद’, सामनातून शिवसेनेचा गौप्यस्फोट

ADVERTISEMENT

‘गृहमंत्र्यांवर केलेल्या आरोपांमध्ये काहीच तथ्य नाही’

‘खरं तर या आरोपात खरंच काहीही तथ्य नाही. म्हणजे तुम्ही हिशोब करा ना… की सगळ्यात आधी कोरोना काळ… त्याआधी सर्वात पहिले या आरोपांमुळे मला स्वत:ला खूप धक्का बसला. आता सगळ्यात आधी आपण विचार करा देशात कोरोनाचे सर्वाधिक बाधित हे महाराष्ट्रात आहेत. कोरोना काळात अनेक रेस्टॉरंट आणि बार हे सुरुच नव्हते. त्यामुळे त्यांनी ज्या प्रकारचे आरोप केले आहेत ते चुकीचे आहेत.

यावेळी काहीही वाटेल ते आकडे फेकण्यात आले आहेत. पण तरीही मी कोणावरही दोषारोप करत नाहीए.’ असं म्हणत सुप्रिया सुळे यांनी गृहमंत्र्यांची एक प्रकारे पाठराखणच केली आहे.

‘अपघाती गृहमंत्री झालात…’, राऊतांच्या टीकेवर दोनदा विचारला प्रश्न; पाहा गृहमंत्र्यांनी काय दिलं उत्तर!

‘ती’ गोष्ट मला स्वतःला खूपच त्रासदायक वाटते’

‘मला मुंबई पोलिसांचा खूपच अभिमान आहे. मी स्वत: मुंबईत अनेक वर्ष राहिली आहे. जेव्हा मी मुंबई आणि महाराष्ट्र पोलिसांना पाहते तेव्हा मला खूप सुरक्षित वाटतं. गृहमंत्री कोण आहेत, सत्तेत आहेत आम्ही आहोत की ती लोकं याने काहीही फरक पडत नाही. आम्ही आमच्या पोलीस दलावर तेवढंच प्रेम करतो आणि आम्हाला त्यांचा अभिमान देखील आहे.’

‘अशावेळी पोलीस दलातील एखादा अधिकारी जेव्हा अशाप्रकारचे आरोप करतो तेव्हा तुम्हाला त्या आरोपांकडे तेवढ्याच गांभीर्याने पाहावं लागतं. महाराष्ट्रात आतापर्यंत अनेक मोठे-मोठे नेते हे गृहमंत्री होऊन गेले आहेत. गृह मंत्रालय हे खूप संवेदशनशील खातं आहे. त्यामुळे याबाबत असं काही घडलं तर ते मला प्रत्यक्ष त्रासदायक वाटतं.’ असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

‘माझ्या राज्याचं नाव बदनाम होतंय’

‘मुंबई आयुक्तपदी पोहचण्यासाठी अनेक अधिकारी मेहनत करतात. त्यासाठी अनेक जण आपला घाम गाळतात, रक्त सांडतात. पण जेव्हा एखादा अधिकारी अशा स्वरुपाचे आरोप करतो तेव्हा नक्कीच दु:ख वाटतं. मला वाटतं की, अधिकारी आणि सरकार यांच्यामध्ये एक चांगला संवाद असला पाहिजे.’

‘मला वाटतं कुणी एकमेकांवर चिखलफेक करता कामा नये. त्यासाठी आपण इथे नाही आहोत. अशाप्रकारच्या आरोपांमुळे माझ्या राज्याचं नाव खराब होत आहे. मला माझ्या राज्याचा, देशाचा खूप अभिमान आहे. पण जेव्हा-जेव्हा यासारख्या गोष्टी घडतात तेव्हा-तेव्हा माझं राज्य दुखावलं जातं. त्यावेळी सत्तेत कोण आहे, कोण आरोप करतोय हे महत्त्वाचं नसतं.’ असं मत सुप्रिया सुळेंनी व्यक्त केलंय.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT