उद्धव ठाकरेंना पुन्हा धक्का? शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांचा चिन्हावरुन मोठा दावा

मुंबई तक

केंद्रीय निवडणूक आयोगानं ‘शिवसेना’ हे नाव आणि ‘धनुष्यबाण’ चिन्ह गोठवलं आहे. आयोगाच्या या निर्णयामुळे राज्यातील राजकीय वातावरण तापलं आहे. दरम्यान, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी तीन नवीन चिन्हं आणि नावं निवडणूक आयोगाकडे सादर केली आहेत. ठाकरे गटाने कोणकोणती चिन्हं दिली आहेत? ठाकरे गटाने जी चिन्हं दिली आहेत त्यामध्ये उगवता सूर्य, धगधगती मशाल आणि त्रिशूळ यांचा चिन्हांचा […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

केंद्रीय निवडणूक आयोगानं ‘शिवसेना’ हे नाव आणि ‘धनुष्यबाण’ चिन्ह गोठवलं आहे. आयोगाच्या या निर्णयामुळे राज्यातील राजकीय वातावरण तापलं आहे. दरम्यान, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी तीन नवीन चिन्हं आणि नावं निवडणूक आयोगाकडे सादर केली आहेत.

ठाकरे गटाने कोणकोणती चिन्हं दिली आहेत?

ठाकरे गटाने जी चिन्हं दिली आहेत त्यामध्ये उगवता सूर्य, धगधगती मशाल आणि त्रिशूळ यांचा चिन्हांचा समावेश आहे. तर नावांमध्ये शिवसेना बाळासाहेब ठाकरे, शिवसेना बाळासाहेब प्रबोधनकार ठाकरे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे अशी तीन नावं पण सादर केली आहेत. यातच आता उद्धव ठाकरेंनी सादर केलेली ही चिन्हं निवडणूक आयोगाच्या यादीत नसल्याचा दावा शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी केला आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्यापुढे नवं संकट ओढावतंय का? अशी शक्यता तयार झाली आहे.

संजय शिरसाट यांनी नेमकं काय म्हटलं आहे

उद्धव ठाकरे यांनी पाठवलेली चिन्हं निवडणूक आयोगाच्या 197 च्या यादीत नसल्याचं वक्तव्य संजय शिरसाट यांनी केलं आहे. तर शिंदे गटाकडून पाठवलेली तीन पैकी दोन चिन्हं निवडणूक आयोगाकडे उपलब्ध असल्याचंही शिरसाट यांनी म्हटलं आहे.

निवडणूक आयोगानं दिलेला निकाल हा उद्घव ठाकरेंना मान्य नाही, म्हणुनच त्यांनी दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्यांच्या जागी कुणीही असतं तरी उच्च न्यायालयात गेलं असतं, हे निर्विवाद आहे. निवडणूक आयोगानं दिलेला निर्णय आमच्यासाठीही दु:खदायक आहे. आम्हालाही ‘धनुष्यबाण’ हे चिन्ह पाहिजे होतं आणि त्यांनाही पाहिजे होतं. पण न्यायालयीन धावपळीत विलंब झाला, असं शिरसाट यांनी म्हटलं आहे. संजय शिरसाट हे ‘टीव्ही 9 मराठी’ या वृत्तवाहिनीशी बोलत होते.

हे वाचलं का?

    follow whatsapp